
Ali Sethi: पाकिस्तानी गायकाचे लता प्रेम! दीदींचे गाणे गायिले अन् पार्टीमध्ये कौतूकाचा वर्षाव..Video VIral
Ali Sethi Video VIral: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही एक ग्लोबल स्टार बनली आहे. तिने अलीकडेच अमेरिकेत ऑस्कर पुर्व पार्टीचे आयोजन केले होते. जिथे ऑस्कर 2023 च्या नामांकितांना बोलावण्यात आले होतं. RRR स्टार राम चरण आणि ज्युनियर NTR देखील या भव्य पार्टीत पोहोचले होते. ज्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.
आता त्याच पार्टीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी गायक अली सेठी हा स्वरकोकिळा लता मंगेशकर यांचे सुपरहिट गाणे 'ये समां' गाताना दिसत आहे.
या व्हिडिओत अली सेठी 70 च्या दशकातील हे सुपरहिट गाणं ऑस्करपूर्वीच्या पार्टीत त्याच्या खास शैलीत गाताना दिसला होता. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
प्री ऑस्कर पार्टीत गायलेल्या या गाण्यांचा व्हिडिओ अलीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांने लता मंगेशकर यांनी गायलेली ये समा, समा है ये प्यार का हे गाणी गायली आहेत.
हे गाणे 1965 मध्ये आलेल्या जब जब फूल खिले या चित्रपटातील आहे. या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. तर हे गाणे आनंद बक्षी यांनी लिहिले असून कल्याण आनंदजी यांनी संगीत दिले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पल्लवी शारदा डान्स करताना दिसत आहे, ज्याबद्दल अलीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'आपकी तो क्या ही बात है'.
या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी गायक किंवा अभिनेत्यांने या गाण्यांद्वारे भारतीय चाहत्यांचे प्रेम मिळवळे आहे. आधीही एका पाकिस्तानी तरुणी आयशानेही लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे' या हिट गाण्यावर डान्स करून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.