'पल पल दिल के पास'चा ट्रेलर बघितला का?

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

सनी देओलचा मुलगा करण देओलही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

मुंबई : बॉलिवूडच्या 'स्टार किड्स' ची इंडस्ट्रिमध्ये येण्यासाठी शर्यत सुरु आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

करण देओलसोबत अभिनेत्री सेहेर बाम्बा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचं दिगर्दशन सनी देओलने केलंय. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन काल म्हणजे बुधवारी होणार होतं. पण, मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सनी देओल एका संसदीय कामकाजात व्यस्त असल्यामुळे तो या कार्यक्रमाला येऊ शकला नाही. 

मात्र करणचे आजोबा धमेंद्र या कार्यक्रमाला गेले आणि चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन त्यांनी केलं. ट्विटरच्या माध्यमातून धमेंद्र यांनी ट्रेलर अपलोड केला. ट्विट करताना त्यांनी लिहिलं, "प्रत्येक जमान्याची एक प्रेमकाहाणी असते. आजच्या जमान्याची प्रेमकाहाणी ही आहे." 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pal pal dil ke pass trailer launched