Pamela Anderson : नवरा असावा तर असा, बारा दिवसांचा संसार! पत्नीसाठी सोडली एवढी प्रॉपर्टी

मनोरंजन विश्वात काय होईल याचा भरवसा नाही. हॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी पामेला अँडरसन ही तिच्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.
Pamela Anderson
Pamela Andersonesajak
Updated on

Pamela Anderson : मनोरंजन विश्वात काय होईल याचा भरवसा नाही. हॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी पामेला अँडरसन ही तिच्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिचा अवघ्या बारा दिवसांचा संसार पण तिला तो चांगलाच लाभदायी ठरल्याचे दिसून आले आहे.

त्याचं झालं असं की, पामेला अँडरसनचा पूर्वाश्रमीचा पती जॉन पीटर्सनं त्याच्या संपत्तीमध्ये पामेलाचे नाव समाविष्ट केले आहे. त्यानं आपल्या पत्नीसाठी जेवढी प्रॉपर्टी मागे सोडली आहे त्याचा आकडा ऐकून थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. जॉननं आपल्या संपत्तीमधून तब्बल एक कोटी डॉलरची संपत्ती तिच्या नावे केली आहे.

Also Read - ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

पामेला ही नेहमीच तिच्या वादग्रस्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. मनोरंजन विश्वामध्ये तिचा मोठा चाहतावर्ग आहे. २०२० मध्ये पामेलानं ७७ वर्षांच्या जॉनशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा हा संसार केवळ बारा दिवसच चालला. त्यानंतर त्यांच्यातील वादानं नात्यात कटूता आली. दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला.

Pamela Anderson
Pathan Movie Review : शाहरुख, दीपिका अन् जॉनचा पठाण म्हणजे देशभक्तीचा केविलवाणा प्रयत्न

जॉननं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करताना आपण भविष्यात देखील पामेलाशी प्रेम करत राहू. तिच्याप्रती नेहमीच आदराची व प्रेमाची भावना आपल्या मनात राहिल. असे त्यानं म्हटले आहे. मी तिच्यासाठी जी संपत्ती सोडत आहे त्याची तिला गरज आहे किंवा नाही हे मला माहिती नाही. पण तिच्यासाठी काही करता आले याचा आनंद आहे.

Pamela Anderson
Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

युएस वीकलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच आमच्यात वाद होऊ लागले. तो तणाव आणखी वाढू नये म्हणून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे जॉननं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com