Main Atal Hoon First Look: हुबेहूब अटलजी! पंकज त्रिपाठीचा हा लुक बघाच..

'में अटल हूं'या अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये पंकज त्रिपाठी अटलजींच्या भूमिकेत असून पहिला लुक समोर आला आहे.
pankaj tripathi first look as atal bihari vajpayee in main atal hoon movie directed by ravi radhav
pankaj tripathi first look as atal bihari vajpayee in main atal hoon movie directed by ravi radhav sakal

Atal Bihari Vajpayee Biopic pankal tripathi first look : भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी ज्यांची ख्याती आहे. अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. मराठी दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नाव जाहीर झाले. तर आज अटलजींच्या जयंती निमित्त या चित्रपटातील पंकज त्रिपाठीचा अटल बिहारी वाजपेयी यांच्या रूपातील फर्स्ट लुक समोर आला आहे.

(pankaj tripathi first look as atal bihari vajpayee in main atal hoon movie directed by ravi radhav )

pankaj tripathi first look as atal bihari vajpayee in main atal hoon movie directed by ravi radhav
Maharashtra Shahir: शाहीर साबळेंच्या चित्रपटातून होणार साने गुरुजींची भेट, काय होतं त्यांचं नातं?

काल शनिवारी 24 डिसेंबर रोजी पंकज त्रिपाठीनं एका नव्या पोस्टच्या माध्यमातून 'मै अटल हूं..' या आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिकचं नाव जाहीर केलं तर आज 25 डिसेंबर रोजी अटलजींच्या जयंतीचे निमित्त साधून पंकज आणि रवी जाधव यांनी चित्रपचा एक छोटासा टीझर आऊट केला आहे. ज्यामध्ये पंकजचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला. या व्हिडिओ मध्ये अटल बिहारी वाजपेयी याच्या विविध छटा पंकजच्या रूपाने दाखवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

यावेळी पहिल्या लुक सोबतच पंकजने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''अटल' जी यांचे व्यक्तित्व पडद्यावर साकारण्यासाठी अत्यंत संयमाने मला स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं गरजेचं आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु स्फूर्ति आणि मनोबल याच्या जोरावर मी या भूमिकेला न्याय देऊ शकेन असा मला अटल विश्वास आहे..'' अशी पोस्ट त्याने लिहिले आहे.

पंकज त्रिपाठीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अटलजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पंकजपेक्षा दुसरा कोणताच कलाकार योग्य नसता अशी देखील कमेंट काही जणांनी केली आहे. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी म्हणजे २५ डिसेंबर,२०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com