अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, तर दिग्दर्शन करणार रवी जाधव Atal Bihari Vajpayee Biopic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaj Tripathi to play former Prime Minister,Ravi Jadhav Direction

Atal Bihari Vajpayee Biopic:अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, तर दिग्दर्शन करणार रवी जाधव

Atal Bihari Vajpayee Biopic: रवी जाधव अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपीकचं दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा 'द अनटोल्ड वाजपेयी-पॉलिटिशियन अॅन्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित असणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपीक संदर्भात पोस्ट करताना रवी जाधवनं 'मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए-अटल' हे कॅप्शन आपल्या पोस्टला दिलं आहे. आता हेच सिनेमाचं नावही असणार का अशी देखील चर्चा रंगली आहे. अटलजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता देखील दमदार हवा होता.

पंकज त्रिपाठीचं नाव त्यासाठी जाहीर झाल्यानं आता लोकांमध्ये उत्साह पहायला मिळतोय. अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपीकची घोषणा खरंतर यावर्षी २३ जून रोजी करण्यात आली होती. पण नेमका कोणता अभिनेता ती भूमिका साकरणार याविषयी काहीच अंदाज लागत नव्हता.( Pankaj Tripathi to play former Prime Minister,Ravi Jadhav Direction)

सिनेमातील कलाकारांनी नावं समोर आल्यानंतर अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणाला की, ''एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याची भूमिका पडद्यावर साकारणं हा मी माझा सम्मान समजतो. एक राजकीय नेता असण्यासोबतच ते एक उत्तम लेखक आणि कवी होते. माझ्या सारख्या अभिनेत्याला त्यांची व्यक्तीरेखा साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे''.


हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

सिनेमाच्या मेकर्सनी याच्या रिलीजविषयी काहीच माहिती अद्याप दिलेली नाही. पण त्यांनी चाहत्यांना हे मात्र नक्कीच सांगितले की, पुढील वर्षी ख्रिसमसपर्यंत सिनेमा रिलीज केला जाऊ शकतो.