दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? यावर पंकजा मुंडेंचं फर्मास उत्तर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde participate in bus bai bus show on zee marathi she talks about maharashtra politics

दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? यावर पंकजा मुंडेंचं फर्मास उत्तर..

pankaja munde : गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या आगामी कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जातात. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. आता भाजप आमदार पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये पंकजा यांना काही राजकीय तर काही खासगी प्रश्न विचारण्यात आले आहेत. पंकजा यांनीही यावर भन्नाट फटकेबाजी केली आहे. (pankaja munde participate in bus bai bus show on zee marathi she talks about maharashtra politics)

पंकजा मुंडे सहभागी झालेल्या 'बस बाई बस' च्या आगामी भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी सुबोध भावे त्यांना एक भन्नाट प्रश्न विचारतात. सुबोधने त्यांना विचारलं की, 'तुम्ही कधी दुसऱ्या पक्षाचे आमदार कधी फोडलेत का?' यावर पंकजा ताईंनी अतिशय मजेशीर आणि फिल्मी ढंगाने उत्तर दिले आहे. त्याही अभिनय करत या प्रश्नाचं उत्तर देतात आणि म्हणतात, 'एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू'. पंकजा यांच्या या उत्तराने सर्वजन हसू लागतात.

गेल्या काही महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. भाजपने शिवसेनेचे ४२ आमदार फोडून महाविकास आघाडीला तडा पाडला. जगाच्या राजकारणातील ही मोठी घटना होती. त्यांनंतर आता भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता.विशेष म्हणजे पंकजा यांनी दिलेले उत्तर हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते.

Web Title: Pankaja Munde Participate In Bus Bai Bus Show On Zee Marathi She Talks About Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..