आमिर खानने घेतले राजामौलींकडून खास टिप्स ! विशेष स्क्रीनिंगचे फोटो व्हायरल

विशेष स्क्रीनिंगसाठी दिग्गज कलाकारांना आमंत्रण
Aamir Khan And SS Rajamouli
Aamir Khan And SS Rajamouliesakal

बाॅलीवूड चित्रपटांच्या कमाईत घट होताना दिसत आहे. सरासरी पाहिल्यास एकूण प्रदर्शित चित्रपटांमध्ये खूपच कमी १०० कोटींचा आकडा पार करत आहेत. दुसरीकडे दक्षिणेतील चित्रपटांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपट निर्माते चकित झाले आहेत. अशा स्थितीत हिंदी सिनेमांचे चित्रपट निर्माते तो फाॅर्म्युला मिळविण्याचा प्रयत्न करित आहेत, ज्यामुळे दक्षिणेतील चित्रपटांना इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्यतिरिक्त बाॅलीवूडची दक्षिणेतील सिनेतारकांबरोबर जोडून घेण्याच्या बातम्याही दररोजच येतात. (Laal Singh Chaddha Screening Photo Goes Viral Aamir Khan Watching Movie With SS Rajamouli)

Aamir Khan And SS Rajamouli
देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

आमिरने राजामौलींबरोबर पाहिला आगामी चित्रपट

ब्लाॅकबास्टर हाॅलीवूड चित्रपट फाॅरेस्ट गम्पचा हिंदी रिमेक चित्रपट लालसिंग चढ्ढा (Laal Singh Chaddha) आॅगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच आमिर खान (Aamir Khan) पूर्णपणे आश्वस्त होऊ इच्छित होता. त्याने नुकतेच एक स्क्रिनिंग ठेवले. त्यात दक्षिणेतील अनेक मोठ्या चित्रपट विश्वातील व्यक्तींना बोलवण्यात आले. या स्पेशल स्क्रिनिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तुम्ही दक्षिणेतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौलींना (SS Rajamouli) पाहू शकता.

Aamir Khan And SS Rajamouli
मोदींपेक्षा चांगला श्रोता मिळालाच नाही, विवेक अग्निहोत्रींनी केली प्रशंसा

आमिर खानने राजामौलींकडून घेतले खास टीप्स

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आमिर खानला वाटत होते, की दक्षिणेतील काही अनुभवी आणि यशस्वी कलाकारांनी चित्रपट दाखवून त्यांचे मत जाणून घ्यावे. व्हायरल झालेल्या फोटोत एसएस राजामौली खूपच गंभीर होऊन चित्रपट पाहाताना दिसत आहेत. फोटोत चिरंजीवी आणि नागा चैतन्य यासारखी महान कलाकार आमिर खानबरोबर बसलेले दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com