esakal | 'भारतातल्या लशीवर भरोसा नाय कायं',अभिनेत्री परिणीती ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

actress parineeta chopra

'भारतातल्या लशीवर भरोसा नाय कायं',अभिनेत्री परिणीती ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर (corona)आता कुठे कमी झाल्याच्या बातम्या आपण पाहतो आहोत. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची चर्चाही होत आहे. त्यात देशभरात व्हॅक्सिनेशन मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. राज्यातही वेगानं लसीकरण सुरु आहे. सध्या तीन वेगवेगळ्या व्हॅक्सिन बाजारात (vaccination) उपलब्ध आहेत. बॉलीवूडमध्येही (bollywood) गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनानं शिरकाव केला होता. यात अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी व्हॅक्सिनेशन केले. आणि लोकांनाही व्हॅक्सिनेशनसाठी आवाहन केलं. (parineeti chopra got trolled for taking pfizer vaccine in london users said she does not believe in indian vaccine yst88)

सध्या अभिनेत्री परिणीती चोप्रा (parineeti chopra) ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं आहे. मात्र ते व्हॅक्सिन भारतीय नाही. तर परदेशी आहे. तिनं आपण व्हॅक्सिन घेतल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात परदेशी व्हॅक्सिन घेतल्याचे सांगितले. यामुळे चिडलेल्या ट्रोलर्सनं तिच्यावर टीका केलीय. तुला भारतीय व्हॅक्सिनवर भरोसा नाही का, ते कुठे मिळाले नाही का, असे प्रश्न तिला विचारले आहेत. परिणीतीनं लंडनमध्ये फायझर कंपनीचे व्हॅक्सिन घेतले आहे.

परिणीतीनं सोशल मीडियावर फोटो शेयर करुन त्याला कॅप्शन दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मी आता व्हॅक्सिन घेतले आहे. फायझर कंपनीची व्हॅक्सिन घेतले असून परिणीतीचा तो फोटो तिच्या बहिणीनं म्हणजे प्रियंकानं काढला आहे. परिणीतिच्या चाहत्यांनी तिला काळजी घ्यायला सांगितलं आहे. दुसरीकडे ट्रोलर्सनं तिला नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. ट्रोलर्सचं असं म्हणणं आहे की, परदेशी जाऊन तिथलं व्हॅक्सिन घेणं हे त्यांना आवडलेलं नाहीये...

हेही वाचा: अनुष्काची वामिका ते करीनाचा जे; स्टारकिड्सच्या जन्मानंतरचे पहिले फोटो

हेही वाचा: 'मला सासू हवी' मालिकेतील सुनबाई बिग बॉस मराठीमध्ये ?

व्हॅक्सिन परदेशात आणि अभिनय भारतात. हे बाकी तुला छान जमलं आहे परिणीता. फुकट लस मिळाली म्हणून परदेशात गेली, भारतात पण काम झालं असतं की, या शब्दांत एका ट्रोलर्सनं तिला प्रतिक्रिया दिली आहे. एकापाठोपाठ तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, तिला भारतीय लशीवर विश्वास नाहीये, म्हणून परदेशी कंपनीचे व्हॅक्सिन घेतले. सेलिब्रेटींनी पहिल्यांदा भारतीय व्हॅक्सिनला प्राधान्य द्यायला हवे. त्यांनी तसे केल्यास बाकीचे लोकही देशाच्या व्हॅक्सिन घेतील. असे एकानं म्हटलं आहे.

loading image