esakal | 'मला सासू हवी' मालिकेतील सुनबाई बिग बॉस मराठीमध्ये ?
sakal

बोलून बातमी शोधा

deepti devi

'मला सासू हवी' मालिकेतील सुनबाई बिग बॉस मराठीमध्ये ?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रात (tv entertainment news) आपल्या हटक्या प्रयोगांमुळे बिग बॉस शो (bigg boss season 3 marathi) यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांची त्याला पसंतीही मिळाली आहे. वास्तविक हिंदीमध्ये असणाऱ्या या शो च्या मराठी आवृत्तीला सुरुवातीला प्रतिसाद बेताचा होता. मात्र त्यात वेगवेगळ्या प्रकारचा गॉसिपिंग अॅड झाल्यावर तो शो पाहण्यास प्रेक्षक प्राधान्य देऊ लागले. सध्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांना या पर्वाची ओढ लागली आहे. यंदाच्या तिसऱ्या पर्वामध्ये मला सासू हवी (mala sasu havi) मालिकेतील सुनबाईची भूमिका करणारी अभिनेत्री दीप्ती देवी सहभागी होणार आहे. अशी चर्चा आहे. (bigg boss marathi 3 marathi actress deepti devi will be possible-contestants list reality show yst88)

यापूर्वी तिसऱ्या पर्वासाठी अनेक मराठी अभिनेंत्रीची नावं चर्चेत आली आहेत. त्यात ‘देवमाणूस’ (devmanus) मालिकेतील नेहा खान neha khan, ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashri pradhan), केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, निशिगंधा वाड, किशोरी आंबिये अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, यांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. अशी चर्चा आहे. अद्याप त्यावर कुठलीही अधिकृत माहीती हाती आलेली नाही.

अभिनेत्री दीप्ती श्रीकांत देवी ही मूळची गुजराती आहे. तिचा जन्म पुण्याचा. 2006 मध्ये दीप्तीनं अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. तिनं ‘अवघाचि संसार’ या मालिकेत केलेली अंतराची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. त्यानंतर ‘अंतरपाट’, ‘मला सासू हवी’ यासारख्या मालिकांमध्ये तिची महत्वाची भूमिका होती.

हेही वाचा: 'मेहंदी लगा के रखना'; पहा राहुल-दिशाचा मेहंदी सोहळा

हेही वाचा: "चांगल्या भूमिका फक्त बिग बींनाच मिळतात"; शरत सक्सेना यांची खंत

‘पक पक पकाक’मधून दीप्तीनं मराठी सिनेमात पदार्पण केलं. ‘समर – एक संघर्ष’ या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी होती. ‘परिवार – कर्तव्य की परीक्षा’, ‘बडे अच्छे लगते है’ या सारख्या हिंदी मालिकाही तिनं आपला ठसा उमटविला आहे.

loading image