'चप्पलेनं मारलं, शिव्या दिल्या तो सगळं खोटं बोलतोयं'

Parineeti chopra tweet on Zomato delivery boy hits customer Hitesh chandranee
Parineeti chopra tweet on Zomato delivery boy hits customer Hitesh chandranee

मुंबई:  बँगलोरमधील त्या झोमॅटोच्या प्रकरणानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका डिलिव्हरी बॉयनं महिलेसोबत केलेल्या भांडणामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रानं उडी घेतली आहे. झोमॅटोवाल्यांनी त्यात जातीनं लक्ष घालावं असे परिणीतीनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण वाढताना दिसत आहे. परिणीतीनं त्यावरुन व्टिट केल्यानं सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. संबंधित महिला आणि डिलिव्हरी बॉय यांच्यात झालेल्या हमरीतुमरीवरुन हे प्रकरण वाढताना दिसत आहे. अनेकांनी त्या प्रकरणावर परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

त्याचे झाले असे की, बंगळुरु मधल्या एका महिलेनं झोमॅटो वरुन एक ऑर्डर केली होती. मात्र ती ठरलेल्या वेळेनुसार न येता ती येण्यास साधारण दहा मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर जेव्हा तो डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या घरी गेला तेव्हा त्या महिलेनं त्याला अपशब्द वापरल्याचे त्यानं सांगितले आहे. तर महिलेनं त्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. ती म्हणाली, मी त्याला सांगितले की, आता मला ती फुड डिलिव्हरी नको आहे. तु ते घेऊन जा. यासगळया प्रकरणावर परिणीतीनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली मला असे वाटते की, झोमॅटोनं या प्रकरणात जातीनं लक्ष देण्याची गरज आहे.

जो कोणी चूकला असेल त्याला शिक्षा व्हायला हवी. याप्रकरणात मी अधिक काय करु शकते याविषयी कोणी मला काही सांगावे. मला वाटते तो मुलगा निर्दोष आहे. जे काही झाले ते अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद म्हणावे लागेल. परिणीतीचं ते व्टिट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यावरही अनेक नेटक-यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी हितेशा चंद्राणी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, मी डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारलं हे सगळं खोटं आहे.

अनेकदा एकांगीपणानं विचार केल्यामुळे नको त्या गोष्टी समोर येताना दिसतात. या प्रकरणात तसे काहीसे होत आहे. पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास करावा. मी जे झाले ते सांगितले. आता माझ्यावर जर कोणी चूकीचे आरोप करत असेल तर मी काय म्हणणार असेही त्या महिलेनं यावेळी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com