एका महिन्यात किती कमावतो शाहरुख?, नेटकऱ्याच्या प्रश्नावर किंग खाननं दिलं 'हे' उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pathaan actor shahrukh khan ask about his earning in ask srk sesssion

Shahrukh Khan: एका महिन्यात किती कमावतो शाहरुख?, नेटकऱ्याच्या प्रश्नावर किंग खाननं दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan: 1989 मध्ये सुरू झालेल्या टी.व्ही वरच्या 'फौजी' मालिकेमधून शाहरुखनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शाहरुख खान आज बॉलीवूडचा किंग खान बनला आहे. आज त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही.

मीडिया रिपोर्ट्स मधून माहिती समोर आली आहे की आजच्या घडीला शाहरुख खान ५००० करोडपेक्षा अधिक संपत्तीचा मालक आहे. आता अभिनेत्यानं तो एका महिन्याला किती कमावतो याचं उत्तर दिलं आहे.(pathaan actor shahrukh khan ask about his earning in ask srk sesssion)

हेही वाचा: Hollywood: रोमिओ-ज्युलिएटने तरुणपणातील लैंगिक अत्याचाराचा म्हातारपणात केला खुलासा..

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून ट्वीटरवर वारंवार Ask Srk हे सेशन घेत आला आहे. या सेशनच्या माध्यमातून शाहरुख खान आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधतो आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतो. बुधवारी ४ जानेवारी रोजी शाहरुख खानने ट्वीटरवर पुन्हा एकदा हे सेशन घेतलं आणि त्यात चाहत्यानं त्याला त्याच्या कमाई विषयी थेट प्रश्न केला.

हेही वाचा: Pathaan Trailer Leak: रिलीज आधीच लीक झाला शाहरुखच्या 'पठाण'चा ट्रेलर?, व्हायरल क्लीपनं खळबळ

नेटकऱ्यानं शाहरुख खानला प्रश्न विचारला की, 'एका महिन्यात तू किती कमावतोस?' शाहरुखनं आपल्या चाहत्याला तितक्याच प्रेमानं उत्तर देत म्हटलं की,'प्रेम खूप कमावतो मी..प्रत्येक दिवशी'.

हेही वाचा: Prajakta Mali: 'फक्त दोन दिवस वाट पहा..'; प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करत वाढवली नेटकऱ्यांची उत्सुकता

शाहरुख खान बॉलीवूडचा एक असा अभिनेता आहे जो आपल्या उत्तरांनी नेहमीच चाहत्यांचे मन जिंकत आला आहे. लोकांना शाहरुखचा उत्तरं द्यायचा अंदाज खूप आवडतो. तर एका महिन्यात किती कमावतोस? या प्रश्नावर शाहरुखनं दिलेलं उत्तर देखील चाहत्यांना खूप आवडलं आहे.

हेही वाचा: 'स्वतःला संपवणं हेच माझ्या हातात..',उर्फीच्या पोस्टनं खळबळ

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. २ नोव्हेंबर,२०२२ ला सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमातील दोन गाणी 'बेशरम रंग' आणि 'झूमे जो पठाण' रिलीज झाली होती. लोकांना आता सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे. पण आता लवकरच लोकांची ही प्रतिक्षा संपणार आहे. १० जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. आणि सिनेमा २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.