Pathaan Trailer clip leak fake video..fact of shahrukh khan thumb sup ad.
Pathaan Trailer clip leak fake video..fact of shahrukh khan thumb sup ad.Google

Pathaan Trailer Leak: रिलीज आधीच लीक झाला शाहरुखच्या 'पठाण'चा ट्रेलर?, व्हायरल क्लीपनं खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप पाहून शाहरुखचे चाहते मात्र भलतेच भडकले आहेत आणि सिनेमातलं सस्पेन्स का खराब करताय असा सवालही करू लागलेयत .

Pathaan Trailer: शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे सध्या किंग खानचे चाहते देखील पठाणशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यास उत्सुक असतात.

आज तर सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारीला रिलीज होत आहे या बातमीनं जोर धरला होता. यादरम्यान आता सोशल मीडियावर पठाणचा ट्रेलर लीक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. (Pathaan Trailer clip leak fake video..fact of shahrukh khan thumb sup ad.)

Pathaan Trailer clip leak fake video..fact of shahrukh khan thumb sup ad.
Hollywood: रोमिओ-ज्युलिएटने तरुणपणातील लैंगिक अत्याचाराचा म्हातारपणात केला खुलासा..

सोशल मीडियावर सध्या एक क्लीप व्हायरलं होताना दिसत आहे. लोक म्हणू लागलेयत हाच पठाणचा ट्रेलर आहे. यामध्ये शाहरुख खान ट्रेनवर स्टंट करताना दिसत आहे. तसंच जोरदार फायटिंग करतानाही दिसत आहे. चला जाणून घेऊया या क्लीपमागचं सत्य.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की...''सिनेमातला सस्पेन्स कशाला दाखवताय. शेअर करणं बंद करा''. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे की, ''मला वाटलं हा 'कुली' सिनेमातीलं सीन आहे. ज्यात अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर एकमेकांशी लढताना दिसत आहेत''. तर काही लोकांनी क्लीप नेमकी कशाची आहे हे ओळखून बरबोर लिहिलं आहे की,'अरे ही तर थम्सअप ची जाहिरात आहे'.

हो,हे खरंय...ही कोल्ड ड्रिंकची जाहिरात आहे. याला पूर्ण दाखवलं गेलं नाही, ज्यामुळे काही लोक कन्फ्यूज झालेयत. या जाहिरातीचं शूटिंग 'पठाण'च्या शूटिंग दरम्यान झालं होतं. त्यामुळे शाहरुखचा लूक 'पठाण'च्या लूक सारखाच त्या जाहिरातीत दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com