Pathaan Censor Borad Row : सेन्सॉर बोर्ड आहे की कॉमेडी कट्टा? 'पठाण'ला सुचवले 'हे' बदल

सेन्सॉर बोर्डानं जे बदल सुचवले आहेत ते वाचून बोर्डाला नेमकं झालं तरी काय असा प्रश्न आता सोशल मीडियावरुन विचारले जात आहे.
Pathaan Censor Borad
Pathaan Censor Boradesakal

Pathaan Censor Borad Suggestion: पठाण या चित्रपटामुळे भलेही वाद सुरु झाला असेल. मात्र सेन्सॉर बोर्डानं ज्या गोष्टींमध्ये बदल सांगितला आहे त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. त्यातील काही बदल हे हास्यास्पद असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सेन्सॉर बोर्डानं कोणते बदल सुचवलेत एकदा वाचाच...

चित्रपटातील काही दृष्य आणि शब्द बदलण्याच्या सुचना सेन्सॉर बोर्डाकडून करण्यात आल्या आहेत. त्या सुचना जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या तेव्हा त्यावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आले आहे. काही नेटकऱ्यांनी तर सेन्सॉर बोर्डानं जे बदल सुचवले ते तितके गंभीर स्वरुपाचे आहेत का असा प्रश्न केला आहे.

तर आणखी काही नेटकऱ्यांनी सेन्सॉर बोर्डानं विनोदीपणा सुरु केला आहे. कोणत्याही गोष्टींसाठी चित्रपटातील कथा, संवाद, यातील जीवच काढून टाकण्याचा प्रयत्न यानिमित्तानं होत असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Also Read -

बदल आहेत तरी काय...

- सेन्सॉर बोर्डानं पठाण या चित्रपटाला ए - यु असे सर्टिफिकेट दिले आहे.

- पठाणच्या डायलॉगमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आङे.

- बेशरम रंग गाण्यातील बहुत तंग किया या गाण्याच्या ओळीमधील शॉर्टस आणि डान्स स्टेप्स बदलण्याच्या सुचना केल्या आहेत.

- पठाण चित्रपटातील संवादामध्ये अशोक चक्र हा शब्द बदलून वीर पुरस्कार असे करण्यात आले आहे.

- सिनेमातील संवादात RAW या शब्दाऐवजी हमारे हा शब्द वापरण्याच्या सुचना

- चित्रपटात एका ठिकाणी मिसेस भारतमाता असे म्हटले आहे. त्याऐवजी हमारी भारत माता असा उल्लेख हवा अशी सुचना

Pathaan Censor Borad
Genelia Deshmukh : 'वेड तुझा प्रणय हा नवा!'

हसावं का रडावं....

- एका ठिकाणी स्कॉचचा उल्लेख आहे, त्याऐवजी ड्रिंक असा शब्दप्रयोग करावा असे म्हटले आहे.

- सिनेमात तेरा ठिकाणी पीएमओ हा शब्द वापरला आहे त्याऐवजी मंत्री किंवा राष्ट्रपती असा शब्दप्रयोग करण्याच्या सुचना

- रशियन गुप्तहेर संघटना केजीएबीच्या नावाचा उल्लेख असून त्याऐवजी एक्स एसबीयु हा शब्दप्रयोग करण्याच्या सुचना

- चित्रपटामध्ये रशियाचा उल्लेख ब्लॅक प्रिझन असा असून तो फक्त प्रिझन असा असावा अशा सुचना आहेत.

सेन्सॉर बोर्डानं जे बदल सुचवले आहेत ते वाचून बोर्डाला नेमकं झालं तरी काय असा प्रश्न आता सोशल मीडियावरुन विचारले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com