'आता देवालाच माझी काळजी!' शाहरुखच्या पठाणच्या ट्रेलरची तारीख ठरली | Pathaan Trailer Release Date | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Trailer Release Date

Pathaan Trailer Release Date : 'आता देवालाच माझी काळजी!' शाहरुखच्या पठाणच्या ट्रेलरची तारीख ठरली

Pathaan Trailer Release Date: किंग खान शाहरुखच्या पठाणचा ट्रेलर अजुन का प्रदर्शित झाला नाही, शाहरुख त्याच्या चित्रपटाला होणाऱ्या विरोधाला घाबरला की काय, त्याने खरंच मोठ्या प्रमाणात चित्रपटामध्ये बदल केले की काय असे प्रश्न आता नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.

पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. त्यातच दीपिकाच्या बिकीनीच्या भगव्या रंगावरुन वाद समोर आला होता. त्याला धार्मिक, राजकीय रंग चढला होता. त्यातच एका पाकिस्तानी गायकानं तर बेशरम रंग हे गाणं आपल्या गाण्याची कॉपी असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर माझे गाणे नेटकऱ्यांनी ऐकावे आणि त्यानंतर ठरवावे माझा आरोप खरा आहे की खोटा असे गायकानं म्हटले होते.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Shah Rukh Khan: एसआरके छक्का.. म्हणणाऱ्याला शाहरूख खानने दिलं सडेतोड उत्तर ..

काही राजकीय पक्षांनी तर थेट शाहरुखच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणामही पठाणवर होणार असल्याची चर्चा आहे. दीपिकावर तर महिला आयोगानं देखील कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. मध्यप्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर काही झालं तरी शाहरुखचा चित्रपट हा प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. सेसॉर बोर्डानं देखील पठाणच्या बाबत कडक धोरण स्विकारले आहे.

हेही वाचा: Avatar 2 Collection : बॉलीवूड 300 कोटीत खुश, एकट्या 'अवतार'ची 83 अब्ज 84 कोटींची कमाई!

एवढ्या वादाचा सामना केल्यानंतर अखेर पठाणचा ट्रेलर समोर कधी येणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर किंग खानच्या फॅन्सने पठाणचा फॅन रिव्ह्यु तयार केल्याचे दिसून आले आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख हा रिव्ह्यु पाहिल्यानंतर आता मला देवालाच माझी काळजी असे नक्की म्हणेल. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाहरुखला देखील पठाण चित्रपटाचे मोठे टेन्शन असल्याची चर्चा आहेच.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

सिनेपत्रकार आणि सिनेमा विषयाचे अभ्यासक यांनी ट्विट करत येत्या दहा जानेवारीला पठाणचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षक लाडक्या शाहरुखच्या पठाण चित्रपटाची वाट पाहत आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.