Pathaan Controversy: गुजरातमध्ये 'पठाण'साठी पोलीस कर्मचारी लागले कामाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Movie

Pathaan Controversy: गुजरातमध्ये 'पठाण'साठी पोलीस कर्मचारी लागले कामाला...

शाहरुख खान त्याच्या पठाण या चित्रपटामुळे कमी तर त्याच्या वादामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे किंग खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मग ते गाण्यातील भगवी बिकिनी असो किंवा गाणं चोरीचा आरोप..

सोशल मीडियावर युजर्सकडून चित्रपटावर बहिष्कार टाकून त्यावर बंदी घालण्याची मागणीही केली जात आहे. एकीकडे ट्विटवर तर 'बॉयकॉट पठाण' हा ट्रेंण्ड सुरु झाला तर दुसरीकडे शाहरुखच्या चाहत्यांनीही त्याला फुल सपोर्ट केला.

हेही वाचा: Pathaan Trailer: राडा केला पण दणकाचं दिला! काही मिनिटातचं मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार.. ट्विटरवर नेटकरी सुसाट

मात्र काही नेत्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला तर काहींनी त्यातील गाणे बदलावे अशी मागणी केली. त्यातच गुजरातमधील सिनेमा हॉल मालकांना विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाने पठाणला प्रदर्शित करू नये, असा इशाराच दिला आहे. पठाणला प्रदर्शित केल्यास सिनेमा हॉलचं नुकसान होऊ शकतं. अशी धमकीही दिली आणी कोही ठिकाणी तोडफोडही करण्यात आली.

हेही वाचा: Pathaan: शाहरुखच्या चाहत्याचा कहर! रडत-रडत ट्वीटरवर शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाला,'आत्महत्या करेन जर..'

VHP आणि बजरंग दलाकडून धमक्या मिळाल्यानंतर गुजरातच्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की आम्हाला सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे की जर गरज असेल तर पोलीस संरक्षण दिले जाईल. ज्याने करुन पठाण थिएटरमध्ये प्रदर्शित होइलं.

हेही वाचा: Rakhi sawant: "कोणालाही दुखवण्या आधी दोनदा..." पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राखीची पोस्ट चर्चेत

गुजरात सिनेमा ओनर असोसिएशनचे सचिव वंदन शाह यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीत ते म्हणाले की, 'सरकारी अधिकाऱ्यांसोबतची बैठक चांगली झाली. 'पठाण' प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहांना पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.'

2010 साली शाहरुख खानचा चित्रपट माय नेम इज खान मुंबईत पोलीस संरक्षणात प्रदर्शित झाला होता.