Rakhi sawant: "कोणालाही दुखवण्या आधी दोनदा..." पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राखीची पोस्ट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant and sherlyn chopra

Rakhi sawant: "कोणालाही दुखवण्या आधी दोनदा..." पोलिस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राखीची पोस्ट चर्चेत

ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतच्या आयूष्यात सध्या चांगलीच उलथापालथ सुरु आहे. ऐकिकडे आईची प्रकृती दुसरीकडे लग्नाचा ड्रामा तो संपत नाही तोवर आता तिच्या जिवनात शर्लिन नावाची पुन्हा एक नवीन समस्या आली.

मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिला काल अटक करण्यात आली. राखीची पोलीस ठाण्यात अनेक तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर तिला आंबोली पोलीस ठाण्यातून तिला रात्री उशीरा सोडण्यात आलं.

हेही वाचा: Rakhi Sawant Arrest : राखी नडली, शर्लिननं थेट जेलमध्ये धाडली! नेमकं काय आहे प्रकरण?

त्यानंतर बाहेर आल्यानंतर तिने मिडियाशी बोलणं टाळलं आणि "मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झालायं, माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे" असं म्हणतं एखाद्या राजकीय नेत्यासारखे हात वर करून ती तिथून निघाली मात्र आता राखीनं या प्रकरणा संदर्भात एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा: मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Rakhi-Adil: राखीच्या बाळंतपणावर नवऱ्याचा खुलासा, 'ती तर..'

तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांचा फोटो पोस्ट केलाय,ज्यावर लिहिलयं की, “जगातील सगळ्यात महाग द्रव्य हे अश्रू आहेत. कारण अश्रूंमध्ये १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात. कोणालाही दुखवण्या अगोदर आधी दोनदा विचार करा” त्यासोबत खरयं असं कॅप्शन दिलयं.

आता राखीची ही पोस्ट चर्चेत आली आहे. तिने नावं न घेता शर्लिनवर टिका केली आहे. आता पोस्टच्या कमेंटमध्येही लोक तिचं सांत्वन करत असून शर्लिनवर जोरदार टिका करत आहे.