Pathaan Movie Release: भोपाळमध्ये 'पठाण'वरून राडा! सिनेमागृहाबाहेर हनुमान चालिसा वाचून कार्यकर्त्यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Movie Release

Pathaan Movie Release: भोपाळमध्ये 'पठाण'वरून राडा! सिनेमागृहाबाहेर हनुमान चालिसा वाचून कार्यकर्त्यांचा निषेध

आज सर्वत्र शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत चर्चा आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात होते. एकीकडे शाहरुखचे चाहते चित्रपटाचं कौतुक करतांना थकत नाही आहेत त्याचवेळी दुसरीकडे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची आणि त्याला प्रदर्शित न करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी काही ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहेत.

हेही वाचा: Pathaan Movie Release: पठाण अन् भाईजान एकत्र! 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर रिलीज

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. भोपाळ मधील रंगमहल टॉकीज येथे बजरंग दलाने चित्रपटाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा: Shah Rukh Khan Pathaan: आणि शाहरुख पर्व सुरू.. पठाण च्या पहिल्याच शो ला तुफान गर्दी

भोपाळमधील रंग महल टॉकीजमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासोबत बजरंग दलाचा गोंधळ पाहायला मिळाला. बजरंग दलाचे कार्यकर्ते सिनेमा हॉलच्या तिकीट काउंटरबाहेर धरणा देत बसलेले दिसले.

हेही वाचा: Pathaan Movie Release: पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..

एवढचं नाही तर कार्यकर्त्यांनी या वेळात हनुमान चालीसाचे पठणही केले. तसेच त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले आणि पठाण यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

हेही वाचा: Pathaan Movie Release: इंदूरमध्ये पठाणचे अनेक शो रद्द, थिएटरला आग लावण्याची धमकी तर प्रेक्षकांना पळवले..

याआधी गुजरातमध्ये या चित्रपटाबाबत निदर्शने करण्यात आली होती. गुजरातमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी गुजरात विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांनी चित्रपटाला विरोध होणार नाही असं आश्वासन दिलं. शाहरुखच्या पठाणला अनेक ठिकाणांहून विरोध करण्यात येत आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण' आज म्हणजेच 25 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर पडद्यावर परतला आहे.