
Pathaan Movie Release: पठाण अन् भाईजान एकत्र! 'किसी का भाई किसी की जान'चा टिझर रिलीज
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या 'पठाण' सिनेमाची सध्या सर्वत्र क्रेझ पाहायला मिळतेय. मोठ्या काळानंतर शाहरुख पठाण सिनेमातून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे शो हाउसफूल होत आहेत. एकीकडे किंग खानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची त्याच्या प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. तर आता दुसरीकडे भाईजानच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे. कारण सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे.
हेही वाचा: Pathaan: शाहरुखच्या चाहत्यांचा "पठाण फिव्हर", कुणी 400 तिकिटे घेतली, कुणी फटाके फोडले
२४ जानेवारीला सलमान खानने सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं होतं. त्यानंतर या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांची उत्कंठा वाढली होती. अशातच आता सलमानच्या किसी का भाई किसी की जान सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आलाय. हा टिझर अद्याप सोशल मिडिया किंवा युट्यूबवर रिलीज करण्यात आलेला नाही.
तर पठाण पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेलेल्या प्रेक्षकांना भाईजानच्या या खास सिनेमाचा टीजर पाहता येणार आहे. अनेक चित्रपटगृहांमध्ये पठाण सिनेमा सुरु होण्यापूर्वी सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या सिनेमाच्या टिझर दाखवण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही डबल ट्रीट म्हणावी लागेल.
हेही वाचा: Pathaan: पठाण जोमात बॉयकॉट गँग कोमात! शाहरुखच्या एन्ट्रीन थिएटर झिंगाट..
सध्या तरी पठाण पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना किसी का भाई किसी की जान या सिनेमाचा टिझर पाहण्याची संधी मिळाली असली तरी लवकरच सोशल मीडियावरही सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात येणार आहे. असं असल तरी सलमान खानच्या चाहत्यांना त्याचा नवा अंदाज पाहण्यासाठी फारशी प्रतिक्षा करण्याची गरज पडणार नाही. कारण पठाण पाहण्यासाठी गेलेल्या काही प्रेक्षकांनी या सिनेमाचा टिझर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा: Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल
या टिझरमध्ये सलमान खानची जबरदस्त फाईट पाहायला मिळतेय. सोबतच सलमान आणि पुजा हगडेचा रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय. तसचं सिनेमात साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा कॅमिओ रोल पाहायला मिळणार आहे. हाटिझर पाहिल्यानंतर आता सलमानच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली असेल यात शंका नाही. या वर्षीच्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
दरम्यान पठाण सिनेमामध्ये सलमान खान एका कॅमिओ रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पठाण सिनेमामध्ये सलमान खान २० मिनिटं एका खास भूमिकेत आहे. शाहरूख आणि सलमानला एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी कायमच पर्वणी असते.