Pathaan: 'पठाण' दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर बनवणार रेकॉर्ड, या चित्रपट निर्मात्याने केला हा मोठा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh khan

Pathaan: 'पठाण' दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर बनवणार रेकॉर्ड, या चित्रपट निर्मात्याने केला हा मोठा दावा

शाहरुख खान स्टारर पठाण बॉक्स ऑफिसवर सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे आणि या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा ट्रेंड सध्या थांबणार नसल्याचे दिसते. हा चित्रपट नॉन हॉलिडेच्या दिवशी प्रदर्शित झाला, तरीही चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. आता अशा परिस्थितीत आज २६ जानेवारीला सुट्टी आहे.

अशा परिस्थितीत आज चित्रपट पहिल्या दिवसापेक्षा म्हणजेच २५ जानेवारीपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या कमाईबाबत विविध व्यापार विश्लेषकांच्या मते, संपूर्ण वीकेंड चित्रपटासाठी खूप खास असणार आहे आणि तो 200 कोटींचा आकडा पार करू शकतो. मात्र, त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चित्रपटाच्या कमाईबाबत केआरके म्हणजेच कमाल रशीद खानचा दावा समोर आला आहे. केआरकेने ट्विट करून दावा केला आहे की, दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट ६० कोटींचा आकडा पार करेल. केरके यांनी लिहिले, "आज पठाण चित्रपटाला किमान 10 टक्के वाढ मिळेल. यानुसार चित्रपट दुसऱ्या दिवशी जवळपास 60 कोटींची कमाई करू शकतो".

हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित झाला आणि तो नॉन हॉलिडे होता. पण या चित्रपटाचा वीकेंड ५ दिवसांचा असेल, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ होणार आहे. वीकेंडच्या कमाईतही हा चित्रपट अनेक विक्रम करताना दिसणार आहे.

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. वारंवार मिळणारी सुटी आणि चाहत्यांकडून चित्रपटाला मिळालेला उत्तम प्रतिसादही चित्रपटाची कमाई वाढवण्यास उपयुक्त ठरेल.

टॅग्स :Shah Rukh KhanKRK