
Pathaan Movie Release: बक्कळ कमाई केली तरीही पठाण फ्लॉप? समोर आलंय मोठं कारण
Pathaan Flop: पठाण रिलीज होऊन एक दिवस झालाय. पठाण निमित्ताने शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला. शाहरुख खानचा पठाण काल २५ जानेवारीला संपूर्ण जगभरात रिलीज झाला. पहिल्याच दिवशी पठाण ने सगळ्यांचे रेकॉर्ड मोडीत काढले. पठाण ने जगभरातुन १०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पठाण १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. असं जरी असलं तरी पठाण फ्लॉप झालाय अशा चर्चा सुरु झालायेत.
ट्विटरवर #फ्लॉप_हुई_पठान हा ट्रेंड व्हायरल झालाय. तब्बल ६७ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर ट्विट केलंय. काय झालंय नेमकं असं.. IMDB हि जगभरातल्या सिनेमांची रेटिंग करते. IMDB वर पठाणला सध्या ७.१/१० इतकं रेटिंग आहे. हेच रेटिंग कालपर्यंत ६ वर गेलं होतं. बहुतेक प्रेक्षकांनी पठाणला १ रेटिंग सुद्धा दिलंय. एकूणच सिनेमा मसाला एंटरटेनमेंट असला तरीही बहुतेक प्रेक्षकांना पठाण तितकासा आवडत नाहीये.
दुसरीकडे ट्विटर वर अनेक ठिकाणच्या थेटरबाहेरचे व्हिडिओ आणि फोटो बाहेर आलेत. प्रेक्षकांच्या पठाण पाहिल्यानंतरच्या रिऍक्शन्स व्हायरल होत आहेत. सिनेमा पाहून आल्यानंतर काही प्रेक्षक सिनेमावर नाराज आहेत. याशिवाय पटना, इंदौर, लखनउ, दिल्ली, विमान नगर अशा अनेक ठिकाणी थेटर ओस पडले आहेत. फक्त पाच सहा लोकांच्या उपस्थितीत थेटरमध्ये शो सुरु आहेत. अजूनही काही थेटरबाहेर संघटना पठाणला विरोध करत आहेत.
अशाप्रकारे बॉक्स ऑफिसवर जरी पठाणने बक्कळ कमाई केली असली तरी प्रेक्षकांना सिनेमा न आवडल्याने आणि काही ठिकाणी प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद असल्याने पठाण फ्लॉप होण्याची शक्यता जास्त वाटतेय. नुकताच पठाण १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय. पठाण भारतातला पहिला सिनेमा ठरलाय जो इतक्या कमी वेळात १०० कोटी क्लब मध्ये दाखल झालाय.
पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलं. अलीकडे शाहरुख लाल सिंग चड्ढा , रॉकेटरी, ब्रम्हास्त्र अशा सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.पण प्रमुख भूमिका म्हणून ४ वर्षांनी शाहरुखने पठाण च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलंय. ऍक्शान-थ्रिलर 'पठाण' काल २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.