'बेशरम कुठले? आमचं गाणं चोरलं!' पाकिस्तानी गायकाचा शाहरुखला दणका | Pathaan Besharam Rang Row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Row

Pathaan Row : 'बेशरम कुठले? आमचं गाणं चोरलं!' पाकिस्तानी गायकाचा शाहरुखला दणका

Pakistani singer Sajjad ali Viral Video : बॉलीवूडचा किंग खानच्या पठाणवरील वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून पठाणच्या गाण्यानं आणि त्यातील वेषभूषेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन तर शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसून आले आहे.

आता शाहरुखच्या पठाणवर एक मोठा आरोप पाकिस्तानी गायकानं केला आहे. त्यानं पठाणमधील बेशरम रंग नावाचे गाणे हे माझ्या गाण्यावरुन कॉपी केल्याचे म्हटले आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याच्या गाण्याची एक झलक पोस्ट केली आहे. ते ऐकल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप झाला असून त्यांनी पुन्हा एकदा शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा काय प्रकार आहे असा सवाल विचारला आहे.

Also Read - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की

पाकिस्तानचा लोकप्रिय गायक सज्जाद अलीनं सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट करुन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही गाणे कॉपी केले आणि ते तुमच्या नावानं प्रदर्शित केले हे चुकीचे आहे. असे त्यानं म्हटले आहे. चाहत्यांना आणि नेटकऱ्यांनी देखील शाहरुख आणि दीपिकावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही तर सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. गाणं प्रदर्शित करण्यापूर्वी परवानगी घ्यावीशी वाटली नाही का असा प्रश्नही त्यानं विचारला आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

बेशरम रंग हे गाणे माझ्या अब के हम बिछडे या गाण्याची कॉपी आहे. तुम्ही जर माझे गाणे ऐकले तर मी काय म्हणतो आहे आणि माझा आरोप नेमका काय आहे तुम्हाला कळेल. असेही सज्जाद अलीनं म्हटले आहे.