
Deepika Padukone : 'तू राज कुंद्रा आहेस का? तोंड कशाला लपवते!' दीपिकाला नेटकऱ्यांनी सुनावलं
Pathaan Movie Deepika Padukone Actress : किंग खानच्या पठाणमधील मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एका वेगळयाच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण हा देशभरात चर्चिला जाणारा विषय आहे. त्यावरून आता दीपिका ट्रोल होताना दिसत आहे.
दीपिकाचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वीच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. त्या बिकीनीवरुन धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पठाणला बॉयकॉट करण्याची मागणीही नेटकऱ्यांकडून केली जात होती.
Also Read - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
यासगळ्यात दीपिकाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी दीपिकाचं कौतूक केलं आहे. तिच्या अभिनयाची स्तुती केली आहे. नेटकऱ्यांनी मात्र दीपिकाला ट्रोल केले आहे. त्याचे कारण म्हणजे दीपिका तोंड लपवून पठाण पाहण्यासाठी थिएटरमध्ये आली होती. त्यावेळी नेटकऱ्यांनी तिला तू काय राज कुंद्रा आहेस का, असा प्रश्न तिला विचारला आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, जर तुला तोंड लपवायचेच होते तर मग मीडियाला कशाला बोलावले असा प्रश्न तिला केला आहे.
दीपिका, शाहरुख आणि जॉन अब्राहमच्या पठाणनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटानं आतापर्यत पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे म्हटले जात आहे. पठाण एकापाठोपाठ एक रेकॉर्ड ब्रेक करत निघाला आहे. दुसरीकडे त्यानं बाहुबली २, केजीएफ २ आणि दंगल सारख्या या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
त्याचं झालं असं की, दीपिका पदुकोण मुंबईतील वांद्रे येथील गेटी गॅलेक्सीमध्ये गेली होती. तिथे ती प्रेक्षकांना पठाणबाबत काय वाटते हे जाणून घेण्यासाठी गेली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरचा पोशाख केला होता. फेस मास्कही लावला होता. त्यामुळे ती ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे.