Pathaan Movie Release: नादखुळा माहोल! पोस्टरला दुधाने अंघोळ, तर कुठे सिनेमा संपल्यावर लोकं नाचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pathaan, shah rukh khan, shah rukh khan fans celebration

Pathaan Movie Release: नादखुळा माहोल! पोस्टरला दुधाने अंघोळ, तर कुठे सिनेमा संपल्यावर लोकं नाचले

४ वर्षानंतर ज्याची सर्वाना उत्सुकता होती असा 'पठाण' सिनेमा आज २५ जानेवारीला संपूर्ण भारतभरात रिलीज झाला. पठाण सिनेमाला ओपनिंगलाच तुफान प्रतिसाद मिळाला. संपूर्ण भारतभरात थेटर मध्ये जणू काही पठाण सिनेमाचा उत्सव सुरु झालाय अशाप्रकारे लोकं आनंद साजरा करत आहेत. अनेक वर्षांनी एखाद्या बॉलिवूड सिनेमाला असा प्रतिसाद मिळतोय.

(pathaan movie grand opening shah rukh khan fans celebration in theatre )

हेही वाचा: Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल

पठाण विषयी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एके ठिकाणी पठाण च्या पोस्टरला शाहरुखच्या फॅन्सनी दुधाचा अभिषेक केलाय. याशिवाय शाहरुखच्या पोस्टरवर फुलं उधळली आहेत. शाहरुखच्या फॅन्सनी त्याच्या पोस्टरवर आनंदाची उधळण केली आहे. तर दुसरीकडे एका थेटरमध्ये पठाण संपल्यावर झुमे जो पठाण हे गाणं आहे. या गाण्यावर थेटरमध्ये प्रेक्षकांनी डान्स केला. मोबाईलची फ्लॅश लावत प्रेक्षकांनी तुफान डान्स केला. एकूणच पठाण निमित्ताने संपूर्ण भारतात नादखुळा माहोल आहे.

पठाण च्या पहिल्या शोबाबत शाहरुखच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. पठाणचा मुंबईत सकाळी ७ च्या मॉर्निंग शो लाच प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. इतका विरोध होऊनही प्रेक्षकांनी शाहरुखच्या पठाण ला डोक्यावर घेतलंय. या चित्रपटात किंग खान अॅक्शन अवतारात दिसत असल्याने चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतेच, त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा: Pathaan: कतरिनाने केली 'पठाण' च्या मिशनची पोलखोल! दीपिका म्हणाली...

पठाण सिनेमाच्या बेशरम रंग गाण्यावरून भारतात चांगलाच वाद निर्माण झालेला. हा सिनेमा बॉयकॉट करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती. सिनेमा चालणार नाही असंही अनेकांचं मत होतं. पण पहिल्याच दिवशी पठाण ला जो तुफान प्रतिसाद मिळालाय त्यामुळे पठाण आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार असं दिसतंय.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पठाण' आज म्हणजेच 25 जानेवारी रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर पडद्यावर परतला असून तो अॅक्शन अवतारात दिसणार आहे. चित्रपटाबद्दल लोकांची क्रेझही दिसू लागली आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांचा अंदाज वेगळा आहे.