Pathaan Movie Mistakes: 'पठाण' पाहिलात?, मग सिनेमातील 'या' 7 चूका कशा सुटल्या तुमच्या नजरेतून? Shahrukh Khan Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan 7 Mistakes

Pathaan Movie Mistakes: 'पठाण' पाहिलात?, मग सिनेमातील 'या' 7 चूका कशा सुटल्या तुमच्या नजरेतून?

Pathaan Movie Mistakes: तब्बल ४ वर्षानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. शाहरुख खान,जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण अभिनित 'पठाण' पाहण्यासाठी सिनेमागृहात झुंबड उडालेली दिसत आहे. शाहरुख खान याआधी कधी अशा जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसला नव्हता,पण चाहत्यांना त्याचा हा अवतार खूप पसंत पडताना दिसत आहे.

सिनेमातील अॅक्शन सीन पाहून असं वाटतंय की कोणतंही संकट आलं तरी शाहरुखच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही. आणि हे तर होणारच होतं. सिनेमातील हे जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स हॉलीवूडचे टॉपचे अॅक्शन दिग्दर्शक Casey O'Neil,Craig Macrae आणि Sunil Rodrigues सारख्या दिग्गजांनी दि्गदर्शित केले आहेत आणि हे सिनेमा पाहताना पावलोपावली जाणवत आहे.

पण यादरम्यान सिनेमात काही असे सीन देखील आहेत जे लोकांचं डोकं चक्रावून सोडत आहेत. काही सीन शूट करताना मेकर्सकडून काही चुका नक्कीच झाल्यात याची चर्चा आता रंगली आहे.

शाहरुखच्या 'पठाण' ची जादू बॉक्स ऑफिसवर चालणं खूप गरजेचं होतं. कारण गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचे सिनेमे ज्या पद्धतीनं बॉक्सऑफिसवर मान टाकताना दिसत होते आणि ज्या पद्धतीनं साऊथचे सिनेमे बॉलीवूडवर दबंगगिरी करताना दिसत होते त्यासाठी 'पठाण' नं दबदबा निर्माण करायला हवाच होता.

'पठाण;नं साऊथ इंडस्ट्रीला जोरदार टक्कर दिल्याचं दिसत आहे आणि जे लक्ष्य समोर ठेवलं होतं त्यात 'पठाण' यशही मिळवताना दिसत आहे. सिनेमातील अॅक्शन सीन हॉलीवूडच्या मार्वल मूव्हीज 'फास्ट अॅन्ड फ्युरियस' सीरिज, 'मिशन इम्पॉसिबल' सारख्या सिनेमांची आठवण करुन देत आहेत. आता थोडं आपण बोलणार आहोत ते सिनेमातील काही अशा सीन्स विषयी जिथे मेकर्स अॅक्शन सीन्स जबरदस्त करण्याच्या नावाखाली काही चुका करून बसले आहेत.

शाहरुखचा चॉपरवाला मॅजिकल सीन...

१.शाहरुखचा सगळ्यात पहिला अॅक्शन सीन,जिथे त्याला खुर्चीला बांधून ठेवण्यात आलंय अन् एक दहशतवादी त्याची धुलाई करतोय,शाहरुखचा चेहरा रक्तानं अक्षरशः माखलेला आहे. आणि मग अचानक जबरदस्त फायटिंग सुरु होते..आणि चहूबाजूंनी दहशतवाद्यांच्या घेऱ्यात असलेला शाहरुख एकेकाची धुलाई करायला सुरुवात करतो...बरं तो सगळ्यांना मारून टाकतो..आणि जिथे त्याला बंदी बनवून ठेवलेलं असतं तिथून गेट बंद असल्यानंतरही एका बंद एरियातून चॉपर घेऊन भूर्र्कन उडून जातो.

चॉपरवर मशीन गन्स आणि गोळ्यांचा वर्षाव होताना दिसतो पण 'पठाण'च्या केसालाही धक्का लागत नाही. आता हे आपल्या सगळ्यांनाच सहज कळतं की तो 'पठाण' आहे,सिनेमाचा हिरो..त्यामुळे अजून वेगळं काही भयानक संकट त्यावर ओढवलं असतं तरी त्यातून तो बाहेर पडला असता.

२. आता थोडं आठवा सिनेमातला हेलिकॉप्टरचा सीन,जिथे बसच्या टपावर उभा राहून जॉन अब्राहम आणि शाहरुख खान..म्हणजे जीम आणि पठाण जबरदस्त मारपीट करताना दिसतात. यादरम्यान जॉन अब्राहम म्हणजे जीमची ताकद तरी बघा की तो दोन हेलिकॉप्टरना रशीनं बसच्या टपावर बांधून ठेवतो. आता हे पाहून आपणही लगेच म्हणाल...काही पण..असं कुठे असतं का?

सलमान खानच्या एंट्रीचा सीन

३.शाहरुख खान चा एक सीन सिनेमात आहे जिथे रशियामध्ये रक्तबीज चोरी केल्याच्या आरोपाखाली पठाण पकडला जातो. ज्यानंतर शाहरुख खानला बंदिस्त केलं जातं आणि त्याला मारण्यासाठी एका ट्रेनमध्ये नेलं जातं.

अचानक ट्रेनच्या टपावर असा आवाज येतो की जसं एखादी लोखंडी मोठी वस्तू त्याच्यावर पडली आहे. आणि लगेचच तेवढ्यात ट्रेनचं छत तोडून सलमानची एंट्री होते. एखाद्या व्यक्तीनं ट्रेनच्या टपावर उडी मारल्यावर लोखंडाची वस्तू पडल्यासारखा जो आवाज दाखवला आहे ते कुठेतरी पटत नाहीय. बरं पुढे काय घडतं... तर सलमान एवढी उडी मारतो तरी त्याच्या हातातील कपातून कॉफीचा थेंबही खाली पडत नाही. आता प्लीज कुणी हे लॉजिक लावू नये की तो टायगर आहे.

दीपिकाला लागलंय एकीकडे आणि मलमपट्टी दुसरी कडे

४.सिनेमात दीपिका पदूकोणला जेव्हा गोळी लागते तेव्हा ती तिच्या पोटाच्या डाव्या बाजूला स्पर्श होऊन निघून जाते. आणि जेव्हा शाहरुख तिला मलमपट्टी करतो तेव्हा दीपिकाला उजव्या बाजूला लागलेलं दाखवलंय. कदाचित मेकर्स तेव्हा विसरले असावेत की नेमकी दीपिकाला गोळी कुठे मारलेली दाखवलीय.

दरीत पडतानाचा सीन

५. ट्रेनचा एक सीन सिनेमातील अॅक्शन सीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे,जिथे शाहरुख खान आणि सलमान खान दोघे मिळून शत्रूला धूळ चारतात. अगदी मशीन गनच्या हल्ल्यातूनही ते वाचतात आणि नंतर दोघे एका चॉपरला फायरिग करून सहज पाडतात.

जेव्हा ट्रेनचा ब्रिज तुटून खाली पडतो तेव्हा ट्रेनचे डब्बे एकेक करुन दरीत कोसळतात. पण शाहरुख आणि सलमान ज्या पद्धतीनं पळतात ते पाहून खरंच डोळे फिरतील. कारण ट्रेन इतकी लांब असते तरी उडी मारून ते तिला पकडतातच. इथे तर जास्त विचार आपण करण्याची गरजच नाही कारण हे तर होणारच होतं...एक पठाण आणि दुसरा टायगर..त्यांना भले काय अशक्य...

जीम आणि पठाण मधील हा सीन सगळ्यात जास्त मजेदार वाटला

६. तसं पाहिलं तर मार्वल सिनेमातील सुपरहिरोंचे आकाशात सहज भरारी घेणारे सीन आपण कितीतरी वेळा पाहिले असती, पण आकाशात ज्या पद्धतीन शाहरुख खान आणि जॉन अब्राहमचा सीन दाखवलाय ज्यात दोघेही प्लेनसारखे पंख लावून ढगात फायटिंग करताना दिसत आहेत,हे तर सगळ्यात फनी वाटतंय..आणि खूपच वाईटही.

आणि हे असे सीन थोडे पचवायला अर्थात प्रेक्षकांनाही वेळ लागेल. आकाशात एखाद्या विमानाचा वेग घेत डोळ्यांवर कोणताही सेफ्टी चष्मा नं लावता फायटिंग म्हणजे ग्रेटच नाही का..

दीपिका पदूकोणला कधी पोहायला येतं तर कधी नाही...

७. सिनेमात दीपिकाला तिच्या लहानपणापासून पाण्याविषयी फोबिया दाखवला आहे कारण आपल्या डोळ्याच्या समोर तिनं आपल्या वडीलांचे प्राण जाताना पाहिले असतात.

दीपिका बर्फावर स्केटिंग करताना अचानक ब्लास्ट होतो आणि ती थंड पाण्यात बुडते आणि आता मरते की काय असं वाटेपर्यंत तिची अवस्था होते. या दरम्यान शाहरुख जॉनचा पाठलाग करणं सोडून दीपिकाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो. पण त्यावेळी अचानक दीपिका ऑरेंज मोनोकिनीत पाण्यात मस्त पोहोताना दिसते.