esakal | Pavitra Rishta 2.0:शाहिर शेख,अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक
sakal

बोलून बातमी शोधा

pavitra rishta

Pavitra Rishta 2.0:शाहिर शेख,अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात आपल्या वेगळेपणासाठी लोकप्रिय झालेली मालिका म्हणून पवित्र रिश्ता (pavitra rishta) या मालिकेकडं पाहिलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका कित्येकांच्या परिचयाची आहे. सध्या ती चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. त्याच्या फर्स्ट लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शाहिर शेख (shahir shekh and ankita lokhande) आणि अंकिता लोखंडे यांनी हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. (Pavitra Rishta Shaheer Sheikh And Ankita Lokhandes first Look)

गेल्या दीड वर्षभरापासून कोरोनानं सर्वच क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम केले आहेत. त्याला मनोरंजन क्षेत्रही अपवाद नाही. अद्याप कित्येक मालिकांचे चित्रिकरण सुरु झालेलं नाही. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले आहे. याशिवाय टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील(tv entartainment) काही सेलिब्रेटींनी कोरोनामुळे आपल्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र वेगळ्या परिस्थितीनतून जातान दिसत आहे.

पवित्र रिश्ता मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्यानं चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. अभिनेता शाहिर शेख हा या मालिकेत मानवच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका कोणेएकेकाळी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं (sushant singh rajput) केली होती. तर त्याची मैत्रीण अंकिता लोखंडे (ankita lokhande) ही अर्चनाच्या भूमिकेत होती. या मालिकेचा फर्स्ट लूक शाहीर आणि अंकितानं सोशल मीडियावर शेयर केला आहे.

हेही वाचा: 'नोराचा तोरा' फोटो असे की, तब्येत खूश...

हेही वाचा: बॉलिवूड कलाकारांच्या टॅटूमागील कारण माहितीये?

पवित्र रिश्ता मालिकेचे दुसरे पर्व कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून होते. या मालिकेचा डिजिटल रिमेक आता प्रेक्षकांसमोर पुढील काही दिवसांत येणार आहे. फर्स्ट लूक शेयर करताना संबंधित कलाकारांनी लिहिलं आहे की, पुन्हा एकदा नव्या भूमिकेत येतो आहे याचा मनस्वी आनंद आहे. पवित्र रिश्तामधील ती एक आगळी वेगळी प्रेमकथा आहे. ती काही साधीसुधी नाही तर फारच वेगळी आहे. अल्ट बालाजीवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मालिकेच्या मेकर्सनं शाहिर आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचाही फोटोही शेयर केला आहे.

loading image