Pawan Kalyan: जाळ आन धूर....! पवन कल्याणचा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी चक्क थिएटरमध्ये लावली आग

Pawan Kalyan:
Pawan Kalyan
Pawan Kalyan

Pawan Kalyan: पुरी जगन्नाथ दिग्दर्शित 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' (Cameraman Gangatho Rambabu) हा पवन कल्याणचा (Pawan Kalyan) चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हा 12 वर्षा पूर्वीचा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय आंध्र प्रदेशमधील नांद्याला येथील थिएटर मालकानं घेतला. पण हा निर्णय घेणं आता त्या थिएटर मालकाला चांगलंच महागात पडलं आहे. काही चाहत्यांनी 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' या चित्रपटाच्या शोदरम्यान थिएटरमध्ये आग लावली.

काही प्रेक्षकांनी 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आल्यानंतर चाहत्यांनी थिएटरमध्ये आग लावली आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले. ANI च्या ट्विटर (X) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पवन कल्याणच्या 'कॅमेरामॅथन गंगाथो रामबाबू' या चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षक थिएटरमध्ये पेपर जाळत आहेत आणि त्या आगीचा धूर सगळ्या थिएटरमध्ये पसरला आहे.

पाहा व्हिडीओ:

थिएटरमध्ये फटाकांची अतषबाजी करणे तसेच थिएटरमधील खुर्च्या तोडणे यांसारख्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. 2023 मध्ये विजयवाडा येथे काही चाहत्यांनी दारूच्या नशेत एका थिएटरची तोडफोड केली तेव्हा पोलिसांनी त्यांना ताकीदही दिली. तसेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com