अखेर स्वप्नपूर्ती झाली.. अभिनेता अजय पुरकरने या ऐतिहासिक ठिकाणी बांधलं घर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pawankhind fame marathi actor ajay purkar built new home at vishalgad

अखेर स्वप्नपूर्ती झाली.. अभिनेता अजय पुरकरने या ऐतिहासिक ठिकाणी बांधलं घर

ajay purkar : शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची पाटी दिमाखात मिरवलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे साकारले आहेत अभिनेता अजय पुरकर यांनी. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. अजय पुरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे. (pawankhind fame marathi actor ajay purkar built new home at vishalgad)

हेही वाचा: प्राजक्ता माळीचं झालं ब्रेकअप.. म्हणाली, मला तेव्हाचं काहीही..

पावनखिंड सिनेमा विषयी अजय म्हणाले,' या सिनेमामुळे फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरुन प्रेम मिळालं आहे. हे सगळे छोटे दोस्त मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून रडत उठला आणि म्हणाला बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत मला तिकडे घेऊन चला. हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं. या पीढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचं बलिदान पोहोचतं तेव्हा खरं सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल.'

अजय पुरकरने अनेक महत्वाच्या भूमिका आजवर साकारल्या आहेत. केवल बाजीप्रभू देशपांडे यांचीच भूमिका नाही तर 'शेर शिवरज' या चित्रपटात त्यांनी तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. अजय यांची शिवनिष्ठा कायमच त्यांच्या भूमिकेतून दिसत आली आहे. आपण ज्या बाजीप्रभू यांची भूमिका केली त्यांच्या पावन भूमीत आपलंही एक घर असावं अशी इच्छा त्यांची होती. अखेरी ती पूर्ण झाल्याने एक वेगळाच आनंद त्यांना झाला आहे.

Web Title: Pawankhind Fame Marathi Actor Ajay Purkar Built New Home At Vishalgad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top