esakal | पोलिसांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट, पायल चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

Payal Rohtagi

पोलिसांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट, पायल चर्चेत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी (bollywood actress and model payal rohatagi) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिनं पोलिसांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेली पोस्ट. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं गोव्यामध्येही एक हॉट फोटोशुट (hot photoshoot) केलं होतं. त्यामुळे ती चर्चेत आली होती. तेव्हा त्या स्थानिक गावातील लोकांनी तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. गेल्या महिन्यात तिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली होती. तिनं आपल्या सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ केली होती. (payal rohatgi shares video demanding apology from ahmedabad police for deletes it later)

त्या चेअरमनला जीवे मारण्याची धमकी तिनं दिली होती. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटकही (payal arrest) करण्यात आली होती. तिची जामिनावर सुटका झाल्यानंतर तिनं आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन पोलिसांवर टीका केली. पायलनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिनं पोलिसांवर निशाणा साधला आहे. मात्र काही वेळानंतर तिनं तो व्हिडिओ डिलीटही केला आहे.

पायलला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा तिनं सांगितलं होतं की, पोलिसांनी माझ्याविरोधात जे काही केलं त्याचा त्यांनी गांभीर्यानं विचार करायला हवा. माझ्याकडे काही सीसीटिव्ही फुटेज आहेत. त्यामुळे माझी बाजू सगळ्यांसमोर येईलच. मी काहीही केलेले नाही. जे काही असेत तर कोर्टात मी मांडेल. मला कुणा साक्षीदाराची गरज नाही. असं पायलनं म्हटलं आहे.

त्या व्हिडिओमध्ये पायल म्हणते, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की, अहमदाबाद पोलीसांनी मला 25 जून रोजी केलेली अटक ही चूकीची होती. त्यांना मला अपमानित करायचे होते. त्यामुळे यापुढील काळात मी स्वतला सिद्ध करेलच. मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांकडून जे कृत्य झाले त्याविषयी मला खेद वाटतोय. अशी भावना देखील पायलनं व्यक्त केलीय.

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक

loading image