esakal | पर्ल पुरी प्रकरण: पीडित मुलीनेच घेतलं अभिनेत्याचं नाव- वकील
sakal

बोलून बातमी शोधा

pearl v puri

पर्ल पुरी प्रकरण: पीडित मुलीनेच घेतलं अभिनेत्याचं नाव- वकील

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी अभिनेता पर्ल व्ही. पुरी Pearl V Puri १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. पर्लला अटक झाल्यापासून टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्याच्या बाजूने उभे राहिले. इतकंच नव्हे तर पर्ल निर्दोष असल्याचं म्हणत पीडित मुलीच्या आईनेही त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र पीडित मुलीने जबाब नोंदवताना अभिनेता पर्लचं नाव घेतल्याचं तिच्या वडिलांच्या वकिलांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासादरम्यान मुलीचा बलात्कार झाल्याचं निष्पन्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं. 'स्पॉटबॉय' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. (Pearl V Puri case Victims fathers lawyer releases statement says girl herself named the actor)

'पाच वर्षांची पीडित मुलगी ही गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या आईसोबत राहत होती आणि वडिलांशी तिचा कोणताच संपर्क नव्हता. एके दिवशी जेव्हा तिचे वडील तिच्या शाळेत फी भरण्यासाठी गेले, तेव्हा मुलीने धावत त्यांच्याजवळ येऊन घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. पीडित मुलीने अभिनेत्याने साकारलेल्या रगबीर या भूमिकेचं नाव घेऊन त्याच्यावर आरोप केले आहेत. तपासादरम्यान रगबीरची भूमिका साकारणारा अभिनेता हा पर्ल पुरी असल्याचं स्पष्ट झालं. पीडित मुलीने दंडाधिकाऱ्यांसमोरही अभिनेत्याचं नाव सांगितलं,' असं वकील आशिष दुबे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: 'बलात्कार प्रकरणी पर्ल निर्दोष'; पीडितेच्या आईने घेतली अभिनेत्याची बाजू

निर्माती एकता कपूर, अभिनेत्री अनिता हसनंदानी, क्रिस्टल डिसूझा, निया शर्मा, अली गोणी या कलाकारांनी पर्लची बाजू घेतली. पर्लवरील बलात्काराचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं.

कोण आहे पर्ल पुरी?

पर्लने बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'नागिन ३', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' या मालिकांमध्ये त्याने काम केलंय. 'ब्रह्मराक्षस २' या मालिकेतही तो झळकला होता. २०१३ मध्ये त्याने 'दिल की नजर से खुबसूरत' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.