esakal | 'बलात्कार प्रकरणी पर्ल निर्दोष'; पीडितेच्या आईने घेतली अभिनेत्याची बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

pearl v puri

'बलात्कार प्रकरणी पर्ल निर्दोष'; पीडितेच्या आईने घेतली अभिनेत्याची बाजू

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द टीव्ही कलाकार पर्ल वी पुरीला (peal v puri) एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या समर्थनार्थ बॉलीवूड सहित टीव्ही मनोरंजन (entertainment) क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात टेलिव्हीजनची क्वीन एकता कपूरचाही समावेश आहे. याशिवाय प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माती दिव्या कुमार खोसलानं पर्ल वी पुरीची बाजू घेतली होती. त्यानं काहीही केलेलं नसून उगाच सूड घेण्याचा प्रयत्न त्यामाध्यमातून केल्याचे तिनं म्हटलं होतं. (pearl v puri molestation case victims mother family support of actor makes shocking revelations says he innocent)

या प्रकरणावर पीडीतेच्या आईनं तो निर्दोष असल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला आहे. याबाबत पीडीतेच्या पालकांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात त्यांनी पर्ल हा निर्दोष असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्ल वी पुरीचं प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी त्याच्यावर टीका केली होती.

सध्या सोशल मीडियावर (social media) जी पोस्ट केली आहे त्यातून पीडीतेच्या आईनं देखील पर्ल वी पुरीला सपोर्ट केल्याचे दिसून आले आहे. पीडीतेच्या वडिलांना तिची कस्टडी मिळावी यासाठीचा हा सगळा प्रयत्न असल्याचे तिनं सांगितलं आहे.

हेही वाचा: 'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव

हेही वाचा: Video : माधुरीच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स

पीडीतेच्या पालकांनी जी पोस्ट व्हायरल केली आहे त्यात असं लिहिलं आहे की, मी गेल्या दहा वर्षांपासून माझे वैवाहिक आयुष्य मोठ्या संकटातून जात आहे. दोन वर्षांपासून माझी मुलगी माझ्याजवळ नाही. अशावेळी पीडीतेच्या आईकडूनही कस्टडीसाठी प्रयत्न केले जात आहे.