सुशांतला ड्रग्जची विक्री करत होता, गोव्यातून केली अटक 

 Peddler Who Provided Dugs To Sushant Singh Rajput Arrested By NCB
 Peddler Who Provided Dugs To Sushant Singh Rajput Arrested By NCB

मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्युपश्चात अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड हादरुन गेले होते. त्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन. यामध्ये अनेक दिग्गज कलावंतांचा समावेश होता. त्यांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्यावतीनं तपासासाठीही बोलविण्यात आले होते. आता त्याप्रकरणात एक महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सुशांतला जी व्यक्ती ड्रग्ज पुरवत होती त्याला गोव्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) नं केलेल्या कारवाईमध्ये ड्रग पेडलरला अटक केली आहे.  एका व्यक्तीसह दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिली आहे.  हेमंत शहा उर्फ ​​महाराज असे सुशांतला ड्रग्ज पुरवणा-या व्यक्तीचे नाव असून अनुज केसवानी आणि रीगल महाकाल यांनीही चौकशी दरम्यान हेमंतचे नाव घेतले होते. एनसीबीने काही दिवसांपूर्वी या दोघांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हेमंत हा मुळचा मध्य प्रदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून तो गोव्यात व्यवसाय करत होता. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून 30 ग्रॅम चरस जप्त  केला आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे एनसीबीच्या गोवा सब झोनल युनिट आणि मुंबई एनसीबीच्या एका ऑपरेशनल टीमने माजल वाडो, असगाव येथे 7 आणि 8 मार्चच्या रात्री छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. त्यापैकी एलएसडी (कमर्शिअल क्वांटीटी), चरस 28 ग्रॅम, कोकेन 22 ग्रॅम, गांजा 1.1 किलो आणि 160 ग्रॅम सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केले आहेत.

याशिवाय 500 ग्रॅम ब्लू क्रिस्टल सायकोट्रॉपिक पदार्थही जप्त करण्यात आला आहे. यावेळी ड्रग पॅडलरसह दोन विदेशी नागरिक उगोचुकू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) आणि जॉन इनफिनिटी डेव्हिड (कांगो) यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 10 हजार रुपयांचे भारतीय चलनही जप्त करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com