भारी कोण ?;पेले की मॅरेडोना..

युगंधर ताजणे
Sunday, 29 November 2020

प्रसिध्द दिग्दर्शक अॅनीबल मसानी नेटो यांनी पेले यांच्या आयुष्यावर आधारित पेले बर्थ ऑफ अ नेशन या चरित्र चित्रपटाची निर्मिती केली. 2016 साली आलेल्या या चित्रपटाला समीक्षक, चाहते, जाणकार रसिक यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली.

मुंबई - नुकतचं महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने जगभरातील फुटबॉल प्रेमींनी शोक व्यक्त केला. इतकेच नव्हे तर या प्रतिभावान खेळाडूला निरोप देण्यासाठी इटलीमध्ये लाखोंच्या संख्येनं चाहते उपस्थित होते. जेव्हा केव्हा फुटबॉलचा विषय निघतो त्यावेळी प्रख्यात खेळाडू पेले आणि मेरेडोना यांची तुलना होतेच. त्या दोघांमध्येही कमालीचे वाद होते. अर्थात या दोन्ही खेळाडूंचा काळ पूर्णपणे वेगळा होता. पण तरीही पेले की मेरॅडोना हा वाद होतच राहिला.

प्रसिध्द दिग्दर्शक अॅनीबल मसानी नेटो यांनी पेले यांच्या आयुष्यावर आधारित पेले, बर्थ ऑफ अ नेशन या चरित्र चित्रपटाची निर्मिती केली. 2016 साली आलेल्या या चित्रपटाला समीक्षक, चाहते, जाणकार रसिक यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. आयएमडीबीनेही त्याला 7.2 असे रेटिंग दिले होतं. यात भारतीय प्रेक्षकांच्या दृष्टीनं सांगायची एक महत्वाची बाब म्हणजे ए आर रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. त्यातील जिंगा नावाच्या गाण्याने सर्वांच्या ह्दयाचा ठाव घेतला होता. जिंगा स्टाईल लोकप्रिय करण्याचे श्रेय पेले यांना जाते. त्यांनी या पध्दतीचा वापर करुन ब्राझीलच्या संघाला अनेक सामन्यांमध्ये यश मिळवून दिले.

23 ऑक्टोबर 1940 रोजी जन्म झालेल्या पेले यांचे पूर्ण नाव इडसन अॅरेंटस डू नासीमेंटो असे आहे. ते आता 80 वर्षांचे आहेत. त्यांना पेले या टोपणनावानं ओळखले जाते. अशा पेले आणि मॅरेडोना यांच्यात कधीही एकमत झाले नाही. मॅरेडोना हा आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिध्द होता. त्याची विधानेही एकदम टोकाची असत. अशावेळी पेले आणि मॅरेडोना यांच्यातील वादाने वृत्तपत्राचे रकाने भरुन गेल्याचे दिसून आले आहे. पेलेही काही कमी नव्हते. त्यांनीही मॅरेडोना यांना जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहिले नाही. यासगळ्यात या दोन्ही महान खेळाडूंचे चाहते असणा-यांची मोठी अडचण व्हायची. की कुणाची बाजू घ्यायची.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pelé (@pele)

 

पेले या चित्रपटातून पेलेंना फुटबॉल खेळाचा अनभिषिक्त सम्राट का म्हटले जाते हे कळते. इतक्या प्रभावीपणे विषयाची मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. पेलेंचे लहानपण, त्यांना असणारी फुटबॉलची असणारी आवड, तो खेळ शिकण्यासाठी करावी लागलेली धडपड हे सारे चित्रपटात पाहता येते. यासगळ्यात पेलेचे वडिल कायम त्याच्या पाठीशी असल्याचे दाखविण्यात आले आहे. लहान असतानाचा एक प्रसंग शहरातील एका नामांकित संघाशी त्यांचा सामना ठरलेला. अशावेळी पायात घालायला बूट नाही, अंगावर धड कपडे नाहीत अशा परिस्थितीत पेले आणि त्यांचे सहकारी ज्या जोशात तो सामना खेळतात ते पाहण्यासारखे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pelé (@pele)

शेवटी पेले आणि मॅरेडोना यांच्यात कितीही तुलना झाली तरी ती करताना त्यावेळची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल. पेले यांना अनेक प्रकारच्या मानहानीला सामोरं जावं लागलं. त्यांना त्यांच्या रंगावरुन कित्येकांची बोलणी खावी लागली. अपमान गिळावा लागला. पण काही करुन फुटबॉल खेळण्याची जिद्द सोडायची नाही हे त्यांच्या मनात पक्कं होतं. त्यावेळचे आफ्रीकेचे अध्यक्ष असणा-या नेल्सन मंडेला यांनी पेले यांना त्यांच्यातील नम्रता कमालीची भावली. माणूसकीला जागणारा खेळाडू असे त्यांना जाणवले आणि त्यांनी पेलेला लाइफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवॉर्डने गौरविण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pele or maradona review of pele birth of a legend movie