KGF Chapter 2 : 'अधिरा'चा फस्ट लूक केला शेअर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

- 'केजीएफ चॅप्टर 2'ची आतुरतेने वाट बघणार्‍या रसिकांसाठी, चित्रपटाचे निर्माते एक अपडेट घेऊन आले आहेत.

-  'होमबेल फिल्मज प्रोड्कशन'ने त्यांच्या 'ट्विटर अकाउंट'वर चित्रपटातील गुप्त पात्र 'अधिरा'चा लूक शेअर केला आहे

'केजीएफ चॅप्टर 2'ची आतुरतेने वाट बघणार्‍या रसिकांसाठी, चित्रपटाचे निर्माते एक अपडेट घेऊन आले आहेत. 'होमबेल फिल्मज प्रोड्कशन'ने त्यांच्या 'ट्विटर अकाउंट'वर चित्रपटातील गुप्त पात्र 'अधिरा'चा लूक शेअर केला आहे. चित्रपटात 'अधिराचे पात्र कोण साकारणार हे 29 जुलैला अभिनेता संजय दत्तच्या वाढदिवशी उघडणार आहे. त्यामुळे अधिराची भुमिका बॉलिवूडचा खलनायक करणार आहे, यावर सध्या तरी विश्वास ठेवायला हरकत नाही.

2018 मध्ये हिट ठरलेला 'केजीफ' सिनेमा, प्रेक्षकाना खुश करण्यात यशस्वी ठरला​ होता. आता सगळेच 'केजीएफ चॅप्टर 2' साठी प्रचंड उत्सुक आहेत हे खर.

प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ या सिनेमाच खुप कौतुक झाले. आता प्रेक्षकांना ओढ आहे ती चित्रपटातील 3 गुप्त पात्रांची ओळख होण्याची.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are curious for KGF Chapter 2