'देसी बाॅईज' जॉन-अक्षयच्या चित्रपटांकडे लागले देशाचे लक्ष!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जय- वीरू उद्या एकत्र बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. एकीकडे जॉन अब्राहमचा बाटला हाऊस आहे तर दुसरीकडे अक्षय कुमारचा मिशन मंगल हे दोन्हा चित्रपट उद्या (ता. 15) स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहेत. 

गरम मसाला (2005) ते अगदी हाऊसफुल 2 (2015) या काळात अनेक चित्रपटांमध्ये अभिनेते जॉन अब्राहम आणि अक्षय कुमारने एकत्रन काम केल आहे. आता हे जय- वीरू उद्या एकत्र बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. एकीकडे जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' तर दुसरीकडे अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हे दोन्हा चित्रपट उद्या (ता.15) स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहेत. 

आॅफ स्क्रीनही सुंदर मैत्री असणाऱ्या ह्या दोन्ही मित्रांच्या चित्रपटांची चर्चा सर्वत्र चालू आहे. दोन्ही चित्रपटांचा प्लाॅट हा भारताच्या पुरोगामी काळाच दर्शन घडवणारा असुन बाटला हाऊस हा एक नाजुक विषय आहे. तर मिशन मंगल एक प्रवास आहे भारत मंगळावर पोहोचण्याचा प्रवास.

दोन्ही चित्रपटांच्या टिमने एकमेकांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. तर जाॅन अब्राहमच हे खास ट्विट आपल्याला #Bestfriendgoals देणार आहे. आता या दोन्ही देसी बाॅईजच्या चित्रपटांकडे देशाचे लक्ष लागले आहे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people are waiting for films of our desi boys mission mangal and batla ahouse