अनुपम खेर यांच्याविरुद्ध याचिका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 जानेवारी 2019

मुझफ्फरपूर (बिहार) - "द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध येथील स्थानिक न्यायालयात बुधवारी याचिका दाखल करण्यात आली. या चित्रपटात सार्वजनिक क्षेत्रांतील व्यक्तींचा अवमान केल्याचा दावा ऍड. सुधीर कुमार ओझा यांनी याचिकेत केला आहे. 

उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे या याचिकेची आठ जानेवारीला सुनावणी होणार आहे. खेर यांच्याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना याचेही नाव याचिकेत आहे. 

तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Web Title: Petition against Anupam Kher