'वरणभात लोणचं....', ७ फेब्रुवारीला न्यायालय देणार निकाल | Mahesh Manjrekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

varan bhat loncha kon nai koncha
'वरणभात लोणचं....', ७ फेब्रुवारीला न्यायालय देणार निकाल

'वरणभात लोणचं....', ७ फेब्रुवारीला न्यायालय देणार निकाल

मुंबई : वरणभात लोणचं कुणी नाय कोणाचं (varan bhat loncha kon nay koncha) या दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh manjrekar) यांच्या सिनेमाविरोधात करण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात पूर्ण झाली असून न्यायालय ता. 7 रोजी निकाल देणार आहे. या सिनेमात अल्पवयीन मुलांना (Minor boys adult acting) लैंगिक कृती करताना दाखविले आहे, असा आरोप करणारी फौजदारी तक्रार भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे (seema deshpande) यांनी न्यायालयात केली आली आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर

याबाबत भादंवि 156(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. देशपांडे यांनी यापूर्वी माहीम पोलीस ठाण्यात आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र याची दखल घेण्यात आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या सिनेमाबद्दल नागपूरमध्येही तक्रार करण्यात आली आहे.

Web Title: Petition Filed About Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Marathi Movie Adult Scenes Result Is On Seventh February

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top