esakal | तमन्ना भाटिया आणि विराट कोहली विरोधात कोर्टात याचिका दाखल, दोघांना अटक करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

tamannaah bhatia and virat kohli  

तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली अडचणीत सापडले आहेत. या दोघांनाही अटक करण्यासाठी मद्रास कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे.

तमन्ना भाटिया आणि विराट कोहली विरोधात कोर्टात याचिका दाखल, दोघांना अटक करण्याची मागणी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली अडचणीत सापडले आहेत. या दोघांनाही अटक करण्यासाठी मद्रास कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि कशासाठी होतेय या दोघांना अटक करण्याची मागणी वाचा..

हे ही वाचा: सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, ईडीने दाखल केला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा

तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीवर सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे कोर्टात याचिका दाखल केली गेली आहे. मिडिया रिपोर्टनुसार तमन्ना भाटिया आणि विराट कोहली यांच्याविरुद्ध चेन्नईमधील एका वकिलाने मद्राय हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. वकिलाने आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे की तमन्ना आणि विराट त्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत.

सोबतंच वकिलाने कोर्टामध्ये असा आग्रह केला आहे की ऑनलाईन सट्टेबाजी बंद करण्याचा आदेश द्यावा कारण तरुणांना याची सवय होत आहे.याचिका दाखल केलेल्या वकिलांनी म्हटलं आहे की ऑनलाईन सट्टा खेळणारी कंपनी विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांसारख्या कलाकारांचा वापर करुन तरुण पिढीला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी या दोघांना अटक झाली पाहिजे. वकिलाने ही याचिका या आधारावर दाखल केली आहे की नुकत्याच एका तरुणाने ऑनलाईन सट्टेबाजीमध्ये हरलेली रक्कम परत करता आली नाही म्हणून आत्महत्या केली होती. 

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया मोबाईल प्रिमियर लीगची जाहिरात करतात. हे दोघंही गेमिंग प्लॅटफॉर्मचे ब्रँड अम्बासिडर आहेत. एमपीएलचे सध्या ३ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त यूजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवर ४० पेक्षा जास्त गेम्स आहेत. आयपीएलच्या आधी एमपीएलजवळ सहा क्रिकेट गेम्स आहेत ज्यामुळे यूजर्सना जास्त पर्याय उपलब्ध झाले आहेत.    

a petition has been filed against actress tamannaah bhatia and virat kohli  

loading image