ब्रेकिंग- सुशांत आत्महत्या प्रकरणात ईडीने दाखल केला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

सुशांत आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. ईडीने या प्रकरणात आता मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे.

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता क्षणा क्षणाला वेगवेगळे अपडेट समोर येत आहेत. आता तर या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. ईडी (Enforcement directorate) ने या प्रकरणात आता मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेपीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ईडी चौकशीची मागणी केली होती. याचदरम्यान आता ही नवीन अपडेट समोर आली आहे.

हे ही वाचा: सुप्रिया पिळगावकरांनी १९९५ मध्येच दाखवलं होतं मास्क कसा घालावा, मुलगी श्रियाने केला गमतीशीर व्हिडिओ शेअर 

सुशांतसिंह प्रकरणात बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी ईडीने याप्रकरणातील एफआयआर आणि इतर कागदपत्र बिहार पोलिसांकडे मागितले होते. तसंच ईडीने रिया चक्रवर्ती कुटुंबाच्या दोन्ही कंपन्यांच्या बँक अकाऊंटची माहिती आणि सुशांतच्या बँक अकाऊंटची माहिती देखील मागवून घेतली होती. याप्रकरणाशी संबधित पैशांचे जे काही व्यवहार झाले आहेत त्याची चौकशी आता ईडीमार्फत केली जाणार आहे. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सुशांत प्रकरणाशी संबधित ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलंय, 'या प्रकरणात जनतेचं व्यापक मत आहे की याची चौकशी सीबीआयने करावी. परंतु राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीने याप्रकरणी ईसीआयर दाखल करावा' असं म्हटलं होतं. याप्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग असल्याचं आढळून आल्याने ईडीने चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. 

त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात आता ईडीने हस्तक्षेप केल्याने प्रकरण वेगळीकडे भरकटत असल्याचं पाहायला मिळतंय. सुशांतच्या वडिलांनी त्यांच्या एफआयआरमध्ये १५ कोटी रुपयांचा गैरवापर केला गेला असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी या आरोपात कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता.   

sushant singh rajput case enforcement directorate filed money laundering case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case enforcement directorate filed money laundering case