Phakaat: TDM नंतर 'फकाट'लाही थिएटर मिळेना, दिग्दर्शक हतबल.. म्हणाला, तर.. मी तुमचे पैसे परत करेन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Phakaat marathi movie director Shreyash Jadhav shares emotional note for not getting theatre

Phakaat: TDM नंतर 'फकाट'लाही थिएटर मिळेना, दिग्दर्शक हतबल.. म्हणाला, तर.. मी तुमचे पैसे परत करेन..

Phakaat marathi movie : सध्या मराठी चित्रपट हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. कारण आशय आणि विषयाचा दर्जा असूनही अनेक समस्या मराठी चित्रपटापुढे उभ्या राहिल्या आहेत. कारण मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीय ही मोठी समस्या दर काही दिवसांनी समोर येत आहे.

आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची तीच अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला 'TDM' चित्रपट थिएटर मिळाले नाही म्हणून थांबवण्यात आला. तर 'बलोच' हा प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता पण तोही चित्रपट थिएटर मिळेना म्हणून मागे पडला.

12 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'रावरंभा' या चित्रपटाचेही प्रदर्शन पुढे ढकलले आणि असे करूनही फार काही हाती लागले नाही. अशातच 2 जून रोजी प्रदर्शित झालेला 'फकाट' चित्रपट की थिएटरच्या प्रतीक्षेत आहे.

'फकाट'च्या दिग्दर्शकाने थिएटर मिळेना म्हणून एक अत्यंत भावनिक पोस्ट शेयर केली आहे. यावरून मराठी चित्रपटांच्या दयनीय अवस्थेचा अंदाज येतो..

(Phakaat marathi movie director Shreyash Jadhav shares emotional note for not getting theatre )

'फकाट'मुळे मराठी चित्रपटांचे प्रदर्शन हा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा चित्रपट देखील 12 मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आधीच्या चित्रपटांची अवस्था पाहून या चित्रपटाचे प्रदर्शन काही दिवस पुढे ढकलले आणि 2 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

असे असूनही या चित्रपटाला प्रतिसाद मिळत नाहीय, कारण लोकांच्या मनासारखे शोज् या चित्रपटाला मिळत नाहीय. याचा मोठा फटका या चित्रपटाला बसला असून 'फकाट'चे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी एक भावनिक पोस्ट करत प्रेक्षकांपुढे विनंती केली आहे.

या पोस्ट मध्ये श्रेयश जाधव यांनी लिहिले आहे की, ''प्रेक्षकहो, मी श्रेयस जाधव. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'फकाट' या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक. तुमच्या पैकी काही जणांनी फकाट पाहिला आणि भरभरून हसलात आणि दादही दिली. हे ऐकून खूप आनंद झाला. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अजूनही चित्रपट बघता आला नाही.''

''ऐकाकडे चित्रपटाला नभरभरून प्रेम मिळतंय आणि त्याच वेळी चित्रपटाचे शोज कमी होत आहेत. जर लोकांना चित्रपट आवडत नसता आणि त्यामुळे जर शोज कमी झाले असते तर मी समजू शकलो असतो, पण इथे होतंय उलटच..''

''लोकांपर्यंत सिनेमा पोहोचायला वेळ लागतो आणि सिनेमागृहांनी तो वेळ प्रेक्षकांना द्यायला हवाम असं माझं मत आहे.तरी सिनेमागृहांनी 'फकाट'चे शो कमी करू नये आणि प्रेक्षकांना सिनेमागृहात येण्यास अजून वेळ द्याला ही माझी विनंती.''

''माझी तुम्हा प्रेक्षकांनाही विनंती आहे की, लवकरात लवकर हा चित्रपट बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत 'फकाट'ला पोहोचवा.''

''- टीप- चित्रपट पाहून जर तुम्हाला एकदाही हसू नाही आलं तर मी स्वतः तुमच्या तिकिटाचे पैसे परत करेन, हा माझा शब्द आहे.'' अशी आर्जव करणारी पोस्ट जाधव यांनी केली आहे. यावरून आपल्याला मराठी चित्रपटांच्या सद्यस्थितीचा अंदाज येतो.