अभिनेत्री कंगना रानौत व संदीप सिंह यांचा फोटो व्हायरल; चर्चांना आले अधिक उधाण

संतोष भिंगार्डे
Sunday, 30 August 2020

आता संदीपचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये संदीपसोबत कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलही दिसत आहेत.  

मुंबई ः  अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीबरोबरच संदीप सिंग याच्याविरुद्धदेखील आवाज उठला  आहे. संदीप सिंहने यापूर्वी स्वत:ची सुशांतचा सर्वात जवळचा मित्र म्हणून ओळख केली. पण सुशांत कुटुंबातील सर्वांनीच संदीप सिंगला आम्ही ओळखत नाही असे सांगितले. आता संदीपचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये संदीपसोबत कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेलही दिसत आहेत.  

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणः सलग तिस-या दिवशी रियाची चौकशी

    संदीपचा कंगना आणि रांगोळीसोबतचा एक जुना फोटो समोर आला आहे. यात तिघेही हसताना दिसत आहेत. हा फोटो संदीप सिंहच्या वेबसाइटवरही आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने स्वत: संदीप सिंहला बर्‍याच वेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. पण आता जेव्हा संदीप सिंहसोबतचा तिचा फोटो व्हायरल झाला आहे, तेव्हा आता सोशल मीडियावर कंगनाबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इतकेच नाही तर संदीपने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते की, कंगनाची बहीण रंगोली हिनेही त्याचे कौतुक केले होते.

सुशांतसिंग राजपूतची बहीण श्वेतासिंग कीर्तीकडून रियाचं पितळ उघड, स्क्रीनशॉट केला व्हायरल

 संदीप सिंह हा निर्माता आहे.  14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर रुग्णालय तसेच घर या दोन्ही ठिकाणी संदीप सिंह सर्वात जास्त दिसला. अंकिता लोखंडे हिच्यासमवेत तो स्मशानभूमीतही गेला होता. संदीप सिंहबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता कंगनाही वादात अडकण्याची शक्यता दिसत आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Photo of actress Kangana Ranaut and Sandeep Singh goes viral; There was a lot of discussion