esakal | तीन महिन्याचा 'छोटा हार्दिक पांड्या' पाहिलायं, कसला क्युट दिसतोयं..
sakal

बोलून बातमी शोधा

cover photo of junior hardik pandya

गेल्या काही दिवसांपूर्वी नताशाने मुंबई इंडियन्सला चिअर अप करण्यासाठी मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करुन फोटो व्हायरल केले होते.  

तीन महिन्याचा 'छोटा हार्दिक पांड्या' पाहिलायं, कसला क्युट दिसतोयं..

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू असलेल्या हार्दिक पांड्या याच्या तीन महिन्याच्या छोट्या हार्दिक पांड्याचा म्हणजे अगस्त्य याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगस्त्याच्या आईने नताशा स्तांकोविकने हे फोटो शेयर केले आहेत. त्याच्या त्या क्युट फोटोंना चाहत्यांनी शेकडोच्या संख्येने लाईक्स केले आहे. 

अगस्त्य हा तीन महिन्यांचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने काही फोटो शेयर केले आहेत. इंस्टाग्रामवर शेयर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये दोघे मायलेक सुंदर दिसत आहे.  

या फोटोत नताशा ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. यात विशेष बाब म्हणजे नताशा आणि अगस्त्य यांच्या फोटोला हार्दिक पांड्यानेही लाईक केले आहे.

त्याने म्हटले आहे की, तुम्हा दोघांनाही मी खूप मिस करतो आहे. हार्दिक सध्या अबुधाबी मध्ये आयपीएलमध्ये सामने खेळण्यात व्यस्त आहे.

दोघांच्या त्या फोटोवर फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत. 30 जुलै 2020 रोजी अगस्त्यचा जन्म झाला.  हार्दिक आयपीएलमध्ये व्यस्त असताना दुसरीकडे नताशा इंटास्टाग्रावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नताशाने मुंबई इंडियन्सला चिअर अप करण्यासाठी मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करुन फोटो व्हायरल केले होते.