esakal | 'समाज काय म्हणेल ते ऐकलं नाही, म्हणून सुखी, आनंदी'
sakal

बोलून बातमी शोधा

shefali jariwala

'समाज काय म्हणेल ते ऐकलं नाही, म्हणून सुखी, आनंदी'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवालाला कोण ओळखत नाही? काही वर्षांपूर्वी तिचं काटा लगा हे गाणं आलं होतं. त्या गाण्यानं शेफालीला वेगळी ओळख दिली. तिचं मोठं नाव झालं. शेफालीच्या नावाला एक ग्लॅमर आलं होतं. शेफाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं यापूर्वी काही मुलाखतींच्या माध्यमातून आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाविषयी भाष्य केले होते. शेफालीचे वेगवेगळ्या पोझमधले फोटो पाहणे हा तिच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण असतो. आताही तिचं एक वेगळं फोटोशुट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

शेफालीनं 2014 मध्ये अभिनेता पराग त्यागी याच्याशी दुसरं लग्न केलं. ते आता आनंदी आहेत. काटा लगा गर्ल शेफालीचं पहिलं लग्न काही यशस्वी झालं नव्हतं. हरमीत सिंग याच्याशी 2004 मध्ये तिचं लग्न झालं होतं. पाच वर्ष त्यांचा संसार चालला. त्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरु झाली.

आपल्यावर झालेल्या अन्य़ायाबाबत शेफालीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. बिह बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये शेफालीनं तिच्या पहिल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता.

टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीनं सांगितलं आहे की, तुम्हाला हे कळायला हवं की, तुमच्यावर अन्याय होतो आहे. तुम्हाला विचारात घेतलं जात नाहीये. हिंसा केवळ शाररिकही नसते ती मानसिकही असते. याचा विचार आपण करायला मागत नाही. मला असे वाटते मी माझ्यासाठी निर्णय घेतला. त्याचा मला फायदा झाला.

शेफाली म्हणते, आपल्या देशात सगळ्यात मोठी भीती समाजाची आहे. घटस्फोटाकडे लोकं वेगळ्या नजरेनं का पाहतात हा खरा प्रश्न आहे. मात्र ज्या वातावरणात मी लहानाची मोठी झालीय त्यात मला समाजाचा जास्त विचार करायचा नाही. असे सांगण्यात आले होते. मी त्यानुसारच वागते आणि जगते.

तिनं आपल्या नवीन जोडीदाराविषयीही सांगितलं. शेफाली म्हणते, मी त्यावेळी एकटी होते. आम्ही एकमेकांना लाईक करत होतो. आणि आमच्यातील अनेक गोष्टी आमच्या स्वभावाला जुळणा-या होत्या. त्याचा आनंद वाटतो. आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत असे मला वाटते.

काटा लगा गर्ल म्हणून शेफालीची ओळख असली तरी बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्येही तिला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. शेफाली जरीवालाला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली होती.

loading image