
Siddharth Chandekar - Mitali Mayekar News: अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. मिताली आणि तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर रिल्स व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेत असतात.
मिताली मयेकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत मितालीचे केस मोकळे दिसत असून तिचा एकदम हॉट अंदाज दिसतोय. मितालीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी कमेंट केल्या आहेत.
(please Leave Me Alone.. Here's What marathi actress Mitali mayekar Said On Fan Comments)
"मी माझे केस देखील सांभाळू शकत शकत नाही तर माझे आयुष्य कसे सांभाळणार?!" असं कॅप्शन मितालीने या फोटोला लिहिलंय.
या फोटोखाली एका सोशल मीडिया युजरने "ये सब ताक पिने का कमाल है" अशी कमेंट केली आहे.
या कमेंटवर मितालीने ‘ LEAVE ME ALONEEEE!!..कृपया मला एकटीला राहू द्या’, असा रिप्लाय दिला आहे. मितालीच्या या रिप्लायवर त्याने ‘reply देण्यासाठी धन्यवाद’ अशी कमेंट केली आहे. अशाप्रकारे मितालीची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मितालीच्या या हॉट फोटोवर फॅनने अशी कमेंट का केली यामागचं कारण खास आहे. काहीच दिवसांपुर्वी सिद्धार्थने मितालीला उन्हाळ्यानिमित्त ७ - ८ ताक मागवायला सांगितले होते.
तर मितालीने ७ - ८ ताक न मागवता थेट ८ लिटर ताकाचा मोठा बॉक्स मागवला. त्यामुळे सिद्धार्थ हैराण झाला. सिद्धार्थने ताकाच्या बॉक्सचा व्हिडिओ सर्वांना दाखवला.
त्याने पुढे व्हिडिओमध्ये मितालीला विचारलं. मिताली म्हणाली, ८ लॉटरी ताक मागवायला सांगितलं होतं.
आता एवढी गरमी आहे तर पिऊ आपण दोघे. Hydrated राहू. असं म्हणत मिताली आतल्या खोलीत IPL बघायला निघून गेली.
सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला झिम्मा सिनेमा प्रचंड गाजला होता.
याच झिम्मा सिनेमाच्या पुढच्या भागात सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा झळकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.