पीएम मोदी’ पुन्हा होणार रिलीज;अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात चित्रपटगृहे होणार सुरु ?

narendra modi movie
narendra modi movie

मुंबई - कोरोनाचा फटका सगळयाच क्षेत्रांना बसला. गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ चित्रपटगृहे बंद आहेत. ते सुरु करण्यासंबंधीची चर्चा प्रशासनाबरोबर पार पडत आहे. प्रत्यक्षात प्रेक्षकांना गेल्या सहा महिन्याहून अधिक काळ बंद असलेल्या थिएटरमध्ये कधी प्रवेश मिळणार असा सवाल प्रेक्षकांकडून विचारला जात आहे. दुसरीकडे मोठ्या संख्येने अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित ‘पीएम मोदी’ चित्रपट पुन्हा चित्रपटगृहांमध्ये  प्रदर्शित होणार आहे. याविषयीची अधिक माहिती या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंहने याने दिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही हा चित्रपट 24 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. आता केंद्र सरकारने अनलॉकच्या 5 व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर पासून चित्रपटगृहे सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटगृहे उघडताच ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित  या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

आता पुन्हा चित्रपटगृहे उघडणार असल्यामुळे मी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार केला आहे. माझा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा टीव्हीवर प्रदर्शित झालेला नाही’ असे संदीपने सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे या पेक्षा काय चांगलं असू शकतं असे संदीपने म्हटले आहे. त्यामुळे आता चित्रपट निर्माता संदीप सिंहने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com