Arvind Jagtap: महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस! तापलेल्या राजकारणावर पोस्टमन काकांचा खास संदेश

चला हवा येऊ द्या फेम पोस्टमन काका नेहमीच आसपासच्या परिस्थितीवर भाष्य करतात
chala hava yeu dya, arvind jagtap, sagar karande, arvind jagtap news
chala hava yeu dya, arvind jagtap, sagar karande, arvind jagtap newsSAKAL

Arvind Jagtap News: काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देंवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडताना फडतूस शब्दाचा वापर केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख केला.

या टीकेनंतर भाजप नेते उद्धव ठाकरेंवर अक्षरश: तुटून पडले आहे. उद्धव ठाकरेंवर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसह सर्वजण जहरी टीका करत आहेत.

याच तापलेल्या राजकारणावर चला हवा येऊ द्या फेम पोस्टमन काका म्हणजेच अरविंद जगताप यांनी थेट भाष्य केलंय.

(poet and screenwriter chala hawa yeu dya fame arvind jagtap new poem on maharashtra politics)

chala hava yeu dya, arvind jagtap, sagar karande, arvind jagtap news
Hanuman Jayanti 2023: हनुमानाच्या भूमिकेसाठी दारा सिंगने मांसाहाराचा त्याग केला अन् रात्री झोपेत असतानाच...

अरविंद जगताप यांची कविता पाहूया..

भावा

तू कशाला चिडतूस?

आन कुणामुळं रडतूस?

बेरोजगार आसून ऊडतूस,

महागाईला कवा भिडतूस?

नेत्याचं धुणं रोज काढतूस

बापाचं पांग कवा फेडतूस?

तुझ्या पोटापाण्याचं सोडतूस

आन नकू त्या वादात पडतूस !

तू चमचा व्हायचा इचार कवा एकदा सोडतूस?

महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस!

chala hava yeu dya, arvind jagtap, sagar karande, arvind jagtap news
Radha Sagar: राधा कुठं गेली बघा? तिच्याविना जीव झालाय आधा

अशा शब्दात अरविंद जगताप यांनी मार्मिक भाष्य केलंय. अरविंद जगताप यांची हि कविता अल्पावधीतच व्हायरल झालीय. चला हवा येऊ द्या फेम पोस्टमन काका नेहमीच आसपासच्या परिस्थितीवर भाष्य करत असतात.

फडतूस शब्दावरून जे राजकारण तापलं आहे त्यावर अरविंद जगताप यांनी केलेली ही खास कविता नक्कीच विचार करण्यासारखी आहे.

या कवितेवर नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट करत अरविंद जगताप यांच्या कवितेचं कौतुक केलंय. वाह दादा... छान चपराक. इथे मावळा याचा पण अर्थ सांगायला हवा होता...नाही तर आज काल सगळे मावळे म्हणूनच मिरवतात... नाद खुळा....लय भारी अशा शब्दात अरविंद जगताप यांच्या कवितेवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

अरविंद जगताप हे गेली अनेक वर्ष चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून रसिकांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. सागर कारंडे पोस्टमन काका बनून चला हवा येऊ द्या मध्ये जी पत्रं वाचतो ती पत्रं अरविंद जगताप यांनी लिहिलेली असतात.

अरविंद जगताप यांनी झेंडा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा अशा लोकप्रिय सिनेमांचं लेखन केलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com