Sagar Karande: अन अचानक छातीत दुखू लागलं.. तब्येतीबाबत सागर कारंडेची मोठी अपडेट

सागर कारंडेच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याच्या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला होता, अखेर सागरने त्याबाबत खुलासा केला आहे.
sagar karande shared video for his health update chest pain during hich tar family chi gamant ahe drama
sagar karande shared video for his health update chest pain during hich tar family chi gamant ahe dramasakal
Updated on

sagar karande: गेली काही वर्षे आपल्याला खळखळून हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता सागर कारंडेच्या तब्येतीबाबत गेली दोन दिवस अनेक अफवा समोर येत होत्या. कुणी म्हणत होतं त्याला रुग्णालयात दाखल केले आहे तर कुणी म्हणत होतं त्याला हृदय विकाराचा झटका आला आहे. तर काहींनी तो सीरियस असल्याचेही म्हंटले होते. यावर अखेर अभिनेता सागर कारंडे यानेच खुलासा केला आहे. नेमका काय झालं होतं, याबाबत त्याने स्पष्टता दिली..

(sagar karande shared video for his health update chest pain during hich tar family chi gamant ahe drama)

sagar karande shared video for his health update chest pain during hich tar family chi gamant ahe drama
Amey Wagh: मराठमोळ्या अमेय वाघवर विकी कौशल फिदा.. म्हणाला, मित्रा तुझ्यासोबत..

बऱ्याचदा आपण आपल्या कामात इतके व्यक्त असतो की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचं फटका आपल्याला बसतो. विशेषकरून दिवसरात्र चित्रीकरण करणाऱ्या कलाकारांना याचे भीषण अनुभव येत असतात. याच अनुभवातून आता सागर कारंडे गेला आहे. सागरच्या तब्येती दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. यासंदर्भात त्याने आता खुलासा केला आहे.

sagar karande shared video for his health update chest pain during hich tar family chi gamant ahe drama
Marathi Serial: 'सुकन्या- स्वानंदी' घेऊन येतायत खोडकर सुन, खट्याळ सासू..

सागरच्या 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा 20 नोव्हेंबर रोजी गिरगावातील साहित्य संघात प्रयोग होता या नाटकाच्या प्रयोगाआधी सागरच्या छातीत दुखू लागलं. त्याच्या ही गोष्ट वेळेत लक्षात आल्यानं त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्यानं त्यानं खुलासा करण्यासाठी फेसबुक लाइव्ह करत सागरनं माहिती दिली आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

सागरने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'गेल्या रविवारी 20 नोव्हेंबरला ‘हीच तर फॅमिलीची गंमत’ या आमच्या नाटकाचा प्रयोग संध्याकाळी 4 वाजता साहित्य संघला आयोजित करण्यात आला होता. तेव्हा अचानक माझ्या छातीत दुखू लागले. मला चक्करही आली. दुपारी 12.30 ते1 च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर मी रुग्णालयात गेलो. माझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. माझे रिपोर्ट नॉर्मल आले. पण चेकअप झाल्यानंतर मला डॉक्टरांनी प्रयोग करण्यास किंवा प्रवास करण्यास मनाई केली होती. त्यामुळे हीच तर फॅमिलीची गंमत आहे या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला'.

पुढे तो म्हणाला, 'छातीत दुखण्यामागचे कारण काय असू शकतं यासाठी माझ्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. दिवसातून ईसीजी, डी इको करण्यात आली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यानंतर डॉक्टरांनी गेल्या काही दिवसात माझ्या कामाबद्दल चौकशी केली.  गेला आठवडाभर मी प्रवास करत होतो, रात्री शूटींग, नाटकाचे प्रयोग, प्रवास, जेवण वेळेवर नव्हतं, त्यादिवशी मी काही खाल्लं नसल्याने अॅसिडीटी झाली. अॅसिडीटी वाढल्याने छातीत दुखत होतं, असं डॉक्टरांनी मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी मला घरी देखील पाठवलं. मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ मी बरा आहे. मला काहीही झालेले नाही. तेव्हा कुणीही चुकीची माहिती पसरवू नका, असे सागरने म्हंटले आहेत.

सागरची प्रकृती बिघडल्याने नाटकाचा प्रयोग कसा होणार हा प्रश्न होता. पण प्रयोग रद्द न करता सूत्रधार गोट्या सावंत यांनी फोनाफोनी करून वासूची सासू या नाटकाचा प्रयोग अरेंज केला. यासाठी सर्वच कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली. नाटकाचा प्रयोग उत्तमरित्या पार पडला. त्यामुळे सर्व कलाकार मदतीला धावून आल्याने 'वासूची सासू' या नाटकाच्या टीमचेही सागरने आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.