Oscar 2022 News| निर्मात्याचा खळबळजनक खुलासा,पोलिस अटक करणार होते विल स्मिथला | Will Smith News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will Smith ,Chris Rock, Will Smith News, Oscar 2022 News updates

Oscar 2022: निर्मात्याचा खळबळजनक खुलासा,पोलिस अटक करणार होते विल स्मिथला

ऑस्कर २०२२(Oscar 2022) चा यंदाचा सोहळा अधिक गाजला तो अभिनेता विल स्मिथनं(Will Smith) कॉमेडियन आणि त्या दिवशीचा सोहळ्याचा सूत्रसंचालक क्रिस रॉक(Chris Rock) याच्या कानाखाली मारल्यानं. त्यानंतर विल स्मिथनं माफी मागितली पण जे व्हायरल व्हायचं ते झालंच. यावरनं मीमचा तर नुसता पाऊस पडलेला दिसला सोशल मीडियावर. विल स्मिथच्या याआधीच्या पत्रकारासोबतच्या जुन्या थप्पड प्रकरणानं पण डोकं वर काढलं. उलट-सुलट अशा अनेक चर्चा रंगल्या. पण आता आणखी नवी बातमी या प्रकरणासंदर्भात कळतेय जी शो च्या निर्मात्यानंच दिली आहे. काय आहे ती खळबळजनक बातमी? चला,जाणून घेऊया सविस्तर. (Oscar 2022 News updates)

हेही वाचा: इन्स्टाग्रामवरनं RRR च्या पोस्ट्स डिलीट करण्यावर आलियाचं स्पष्टिकरण

लॉस एंजेलिसमध्ये रंगलेल्या ऑस्कर २०२२ च्या सोहळ्यात म्हणे विल स्मिथनं क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली अन् स्मिथला पकडण्यासाठी म्हणे तिथे लॉस एंजेलिसचे पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. या सोहळ्याचा निर्माता विल पॅकरने ही ब्रेकिंग बातमी दिली आहे. पण पोलिस काही कारवाई करु शकले नाहीत कारण रॉकनं स्मिथविरोधात तक्रार करायला नकार दिला. विल पॅकर म्हणाला,''ख्रिस रॉकला विल स्मिथनं कानाखाली मारल्यानंतर पोलिस पोहोचले होते. त्यावेळी मी ख्रिसच्या बाजूलाच बसलो होतो. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही फक्त तक्रार करा आम्ही त्याला अटक करण्यास तयार आहोत'. त्यांनी ख्रिसला अनेक पर्याय सांगितले पण त्यानं म्हटलं,'मी ठीक आहे,मला कुठली तक्रार करायची नाही'. यामुळे पुढे कोणतीही कारवाई होऊ शकली नाही''. पोलिसांनी देखील सांगितले की,''आमच्याकडे सोहळ्यातील त्या प्रकरणाविषयी माहिती द्यायला नकार दिला गेला,आणि तक्रार करण्यासही समोरुन नाही म्हटंल गेलं त्यामुळे आम्हाला विल स्मिथला अटक करता आलं नाही''.

हेही वाचा: चाहत्यांनाच काय प्रियंकानं आपल्या आईलाही ठेवलंय बाळापासून दूर;कारण कळालं

कॉमेडियन ख्रिस रॉकनं विल स्मिथची पत्नी जेडा हिची तिच्या केसांवरुन खिल्ली उडवली होती. याचा राग आल्यानं स्मिथनं स्टेजवर जाऊन सर्वांसमोर ख्रिसच्या कानाखाली मारली. त्यानंतर विल स्मिथनं ख्रिसची जाहिरपणे माफी मागितली होती. विल स्मिथची पत्नी जेडा हिला केसांचा आजार झाला आहे. ज्यामुळे तिचे केस गळतात. त्यामुळे तिने आपले सर्व केस कापून बाल्ड कट ठेवला आहे. आणि यामुळेच पुढचं सगळं रामायण घडलं होतं.

Web Title: Police Offered To Arrest Will Smith Oscars Producer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top