चाहत्यांनाच काय प्रियंकानं आपल्या आईलाही ठेवलंय बाळापासून दूर; कारण कळालं Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhu Chopra,Priyanka Chopra,Nick Jonas

चाहत्यांनाच काय प्रियंकानं आपल्या आईलाही ठेवलंय बाळापासून दूर;कारण कळालं

देसी गर्ल प्रियंका (Priyanka Chopra)आणि तिचा अमेरीकन पती निक जोनससाठी(Nick Jonas) यंदाच्या वर्षाची सुरुवात मोठा आनंद देणारी ठरली. प्रियंकाचं पाहिलं तर बॉलीवूडपासनं तिनं सुरु केलेला अभिनयाचा प्रवास आता हॉलीवूडमध्येही तिला चांगलं यश मिळवून देत आहे. नुकतेच निक आणि प्रियंका सरोगसीच्या माध्यमातून एका गोड मुलीचे आई-बाबा झाले आहेत. सध्या आपल्या बाळासोबत हे दोघे लॉस एंजेलिस येथील घरात राहत आहेत. तीन महिने उलटून गेले तरी प्रियंकानं अद्याप आपल्या मुलीचा चेहरा काही चाहत्यांना दिसू दिला नाहीय. आता अनुष्का शर्माच्या मुलीला पाहण्यासाठी चाहत्यांना एक वर्ष वाट पहावी लागली होती. आणि नंतरही ती दिसली ते चोरुन कुणा फोटोग्राफरने फोटो काढले म्हणून. असो,तो मुद्दा बाजूला ठेवूया. आता आहे प्रियंकाच्या मुलीची चर्चा. तर चाहतेच काय दस्तुरखुद्द प्रियंकाच्या आईनं म्हणजेच बाळाच्या आजीनंही त्याचा चेहरा पाहिलेला नाही बरं का.

हेही वाचा: करण जोहरनं घातलाय उच्चशिक्षितांच्या लग्नाचा घाट, ट्रोलर्सचा हल्लाबोल

नुकतंच एका कार्यक्रमात प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी आपण नातीचा चेहरा पाहिला नसल्याचं सांगितलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या,'आपल्या नातीला कुशीत घेऊन तिला आजीच्या प्रेमानं खाऊ-पिऊ घालायचा आनंद आपण उपभोगला नाही आहे. त्यावेळेस त्यांनी प्रियंका बाळाच्या जन्मानंतर आई होण्याचा आनंद मनापासून एन्जॉय करतेय हे देखील त्यांनी आवर्जुन सांगितलं होतं.

मधू चोप्रा अद्याप का भेटल्या नाहीत आपल्या नातीला?

ETimes सोबतच्या लाइव्ह सेशन दरम्यानं मधू चोप्रा(Madhu Chopra) यांनी प्रियंकाच्या मुलीविषयी देखील संवाद साधला आहे. मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या,''मी अद्याप आमच्या छोट्या राजकुमारीला पाहिलं नाही. कारण मी भारतात आहे आणि ती लॉस एंजेलिस. कधी तरी व्हिडीओ कॉल होतो. पण बाळाला पाहायचं आहे. मला इतकं माहित आहे की माझी मुलगी आई झाल्यानं खूप आनंदात आहे. 'निक जोनस आणि प्रियंका चोप्रा बाळाला घेऊन भारतात येणार का?' असा प्रश्नदेखील मधु चोप्रा यांना विचारण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या,''मला खुप वाटत आहे त्यांनी यावं. हा देश प्रियंकाचा आहे आणि ती नक्की आपल्या मुलीला घेऊन एकदा येईल''.

हेही वाचा: अमिताभ यांना रश्मिकाचं उलट उत्तर,'गूडबाय' च्या सेटवर घडला प्रकार

आजी या नव्या नात्याविषयी देखील त्या भरभरुन बोलल्या. आजी होण्याची इच्छा मनात होतीच आता ती पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे. ज्या आनंदाची मी वाट पाहत होते अनेक वर्षांपासून तोच हा आनंद आहे. माझा आनंद मी लपवू शकत नाही. आता मी फक्त माझ्या नातीचा विचार करते. तिला कधी भेटेन याचा विचार करत आहे. प्रियंका सध्या तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. 'द मॅट्रिक्स रीअॅक्शन' हा तिचा हॉलीवूड सिनेमा नुकताच भेटीस येऊन गेला. 'सिटाडेल','जी ले जरा' आणि 'एन्डिंग थिंग्ज' हे तिचे काही बॉलीवूड आणि हॉलीवूडचे सिनेमे आहेत.

Web Title: Priyanka Chopras Mother Did Not See Her Granddaughters Face Even After 2 Months Heres The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top