Kamal Haasan: 'पोन्नियन सेल्वन १' विरोधात कमल हासनचा मोठा खुलासा; म्हणाले,'सिनेमात जे दाखवलंय...'

मणिरत्नम यांचा 'पोन्नियन सेल्वन १' रिलीज झाल्यानंतर लगोलग वादालाही सुरुवात झाली होती.
Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu king
Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu kingGoogle

Kamal Haasan: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा पोन्नियन सेल्वन १ रिलीज झाल्यानंतर लगोलग वादालाही सुरुवात झाली होती. दिग्दर्शक वेत्रिमारन यांनी सिनेमावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की,''चोल किंग राजा हा पहिला हिंदू राजा असूनच शकता नाही, कारणचोल साम्राज्याच्या वेळी हिंदू धर्मच नव्हता''. त्यांच्या या वक्तव्यावरनं वाद पेटला आणि त्यानंतर पुन्हा आता तामिळ सुपरस्टार आणि राजकीय नेता कमल हासन यांनी दिग्दर्शक वेत्रिमारनला पाठिंबा दर्शवत या वादात उडी घेतली आहे.(Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu king)

Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu king
Adipurush: 'माफीनामा नकोच,आता थेट..', भाजप नेता राम कदमांची मेकर्सना धमकी

काय म्हणाले होते 'पोन्नियन सेल्वन १' विषयी दिग्दर्शक वेत्रिमारन?

एका कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शक वेत्रिमारन म्हणाले होते,''आपण आपल्या इतिहासापासून दूर जात आहोत. आपण आपली खरी ओळख त्यामुळे विसरत आहोत. राज राज चोल राजाला एक हिंदू राजा म्हणून सारखं संबोधित केलं जात आहे. सिनेमा जनमानसासाठी समाजमनाचा आरसा आहे. त्यामुळे या माध्यमातून आपण जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ते योग्य आणि अचूक गेलं पाहिजे. कोणतीही स्वार्थी विचारधारा मांडण्यासाठी सिनेमाचा आधार घेऊ नये.''

Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu king
Adipurush: सैफला पाहून भडकला महाभारतातील दुर्योधन; पुन्नीत इस्सर म्हणाले,'हा तर...'

वेत्रिमारन यांच्या 'पोन्नियन सेल्वन १' सिनेमावरील अशा प्रकारच्या प्रतिक्रियेनंतर वाद सुरु झाला अन् आता या वादात तामिळ सुपरस्टार कमल हासन देखील सामिल झाले आहेत. कमल हासन यांनी एका कार्यक्रमात म्हटलं की, ''राज राजा चोल यांच्या वेळेस हिंदू धर्म मूळी नव्हताच. त्यावेळी वैष्णव,शैव आणि समानम संप्रदाय होते. इंग्रजांनी त्यांना हिंदू म्हणायला सुरुवात केली कारण त्यांना याविषयी काही फारसं ज्ञान नव्हतं. हे तर अगदी तसंच आहे,जसं त्यांनी 'तुतुकुडी'चं नाव बदलून 'तुतिकोरिन' केलं. कमल हासन यांनी असं देखील म्हटलं आहे की,चोल साम्राज्याच्या वेळी खूप संप्रदाय होते. पण माझ्या अभ्यासात त्यावेळी हिंदू धर्म होता असे कुठेच वाचनात आलेले नाही''.

Ponniyin Selvan: Kamal Haasan reveals that Rajaraja Chola could not be a Hindu king
Ponniyin Selvan -1: सिनेमा रिलीजनंतर काही तासातच मेकर्सला बसला हादरा; काय घडलं नेमकं?

तसं पाहिलं तर 'पोन्नियन सेल्वन १' रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात ऐश्वर्या राय,विक्रम,कीर्ती, तृषा कृष्णन,जयराम रवि आणि शोभिता धूलिपाला सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com