अभिनेत्री पुजा बेदी वीज बील कमी आल्याने होती खुश, आता नवीन बील पाहून बसला धक्का

pooja bedi
pooja bedi

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सगळ्यांची डोकेदुखी वाढली आहे ती भरमसाट येणा-या वीजबिलांमुळे. सेलिब्रिटींच्या बाबतीत तर हे सर्रास होताना दिसतंय. सगळ्यांची वीज बिलं दुप्पट-तिप्पट वाढून येत आहेत. हे पाहून अनेक सेलिब्रिटी वैतागले आहेत. सगळ्यात आधी तापसी पन्नूला भरमसाठ बील आलं होतं त्यानंतर वीर दाससोबतंही असंच झालं. मात्र आता अभिनेत्री पुजा बेदीची देखील बील पाहून झोप उडालीये.

अभिनेत्री पुजा बेदी काही दिवसांपूर्वी वीर दासच्या ट्वीटवर रिप्लाय करत वीजबील कमी आल्याचा आनंद व्यक्त करत होती. आणि त्याला सांगत होती की कसं वीजबील कमी येतं ते. मात्र आता तिलाच समजत नाहीये की तिचं वीजबील एवढं भरमसाठ कसं आलंय ते.

कॉमेडियन वीर दासने २७ जूनला एक ट्वीट करुन विचारलं होती की, 'मुंबईमध्ये असं कोणी आहे का की ज्याचं बिल सामान्य अपेक्षेच्या तीनपट जास्त आलं आहे. यावर अभिनेत्री पूजा बेदीने उत्तर दिलं होतं की, खरतर माझं बील कमी झालं आहे. माझं बील टाटा पॉवर कडून येतं. आणि ते कमाल आहेत. आणखी एक गोष्ट एलईडी बल्बचा वापर करा.' ते जास्त बील वाचवतात. पुजा बेदीचं हे ट्वीट २८ जूनचं आहे. 

मात्र पुजाने आज पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तीने तिच्या नवीन वीजबिलाविषयी सांगितलं आहे. कारण यावेळी तीचं बील नेहमीपेक्षी तीपटीने वाढून आलं आहे. पुजा वीर दास आणि टाटा पॉवर यांना टॅग करत म्हटलंय, 'मी बोलण्यामध्ये जरा जास्तंच घाई केली. माझं या महिन्यांच वीजबील ८००० रुपयांवरुन ३२,२५० वर पोहोचलं आहे ते ही मी मुंबईमध्ये नसताना. आश्चर्य आहे. '

लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींना वाढीव वीजबिलांनी हैराण केलं आहे. साधं सुधं नाही तर या वीजबिलांमध्ये तिपटीने वाढ करण्यात येतेय. आता तर पुजा मुंबईत नसतानाही तिचं बील एवढं वाढून आल्याने यावर चिंता व्यक्त केली जात आहे.   

pooja bedi shocked by electricity bill tweet to tata power  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com